श्री.विलास ढोरे,वडसा तालुका प्रतिनिधी
देसाईगंज,दि.०३/०१/२०२३
दीनदयाळ अंत्योदय योजना-राष्ट्रीय नागरी उपजिवीका अभियान शहर अभियान व्यवस्थापन कक्ष, वसुंधरा व उडाण वस्ती स्तर संघ जुनी वडसा व महिला आर्थिक विकास महामंडळ द्वारा लोकसंचालित साधन केंद्र वडसा च्या संयुक्त विद्यमाने समाज भवन जुनी वडसा देसाईगंज येथे क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले जयंती कार्यक्रम आयोजित करुन महिला बचत गटांतील महिलांना मार्गदर्शन करण्यात आले. यात क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांचे प्रतिमेसमोर दिप प्रज्वलीत करुन व प्रतिमेला माल्यार्पन करुन कार्यक्रमांची सुरुवात करण्यात आली .
या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी देसाईगंज नगर परिषदेच्या माजी नगर सेवीका अश्वीनी कांबळे , तर मार्गदर्शक म्हणून, माजी सभापती श्री सचिन खरकाटे, सहाय्यक प्रकल्प अधिकारी श्री लवकुश उरकुडे, ,तेजोमय लोकसंचालित साधन केंद्राच्या व्यवस्थापक सौ.कुंदा मामीडवार, मुख्याध्यापक श्री चव्हाण सर ,शहर स्तर संघाच्या सचिव कल्पना वासनिक, वसुंधरा वस्ती स्तर संघाच्या भारती कांबळे उडाण वस्ती स्तर संघाच्या अध्यक्षा सरीता ढोरे,अमोल खरकाटे,समुदाय संघटक अरुण मोटघरे ईत्यादी मान्यवर प्रामुख्याने उपस्थित होते.
कार्यक्रमांचे प्रास्ताविक दिपाली कुथे यांनी केले तर कार्यक्रमाचे संचालन सोनाली खरकाटे,आभार प्रदर्शन लता मुळे, या कार्यक्रमास जुनी वडसा येथील ईतर महिला बचत गटाच्या पदाधिकारी व सदस्या यांनी सहकार्य केले .