कोरची तालुका मराठी पत्रकार संघाकडून रुग्णांना फळ वाटप करून पत्रकार दिवस साजरा

श्री.नंदकिशोर वैरागडे,विशेष प्रतिनिधी गडचिरोली जिल्हा,न्यूज जागर 

कोरची,दि.०६/०१/२०२३

कोरची येथील ग्रामीण रुग्णालयात महाराष्ट्र राज्य मराठी पत्रकार संघाच्या वतीने बालशास्त्री जांभेकर यांच्या जयंती निमित्त ग्रामीण रुग्णालय अधिक्षक डॉ अभय थुल यांच्या उपस्थितीत रुग्णांना फळ वाटप करून पत्रकार दिवस साजरा करण्यात आले.

यावेळी कोरची तालुका म.राज्य. मराठी पत्रकार संघाचे अध्यक्ष शालीकराम कराडे, जिल्हा सचिव नंदकिशोर वैरागडे, तालुका उपाध्यक्ष सुरज हेमके, संघटक राष्ट्पाल नखाते, सदस्य राहुल अंबादे, नरेश सहारे, जितेंद्र सहार, मधुकर नखाते, लालचंद जनबंधू रुग्णालयातील अधिपरिचिका आशा भसरकर, राणी मोराडे, मिनाक्षी गेडाम, परिचारिका वैशाली जेंगठे तसेच रुग्ण व रुग्णाचे नातेवाईक उपस्थित होते.