श्री.विलास ढोरे,वडसा तालुका प्रतिनिधी,न्यूज जागर
देसाईगंज,दि.०७/०१/२०२३
मराठी वृत्तपत्रसृष्टीचे जनक दर्पणकार आचार्य बाळशास्त्री जांभेकर यांची जयंती पत्रकार दिन म्हणून आमदार कृष्णा गजबे यांच्या कार्यालयात साजरी करण्यात आली. याच दिनाचे औचित्य साधून भारतीय युवा मोर्चा गडचिरोली च्या वतीने देसाईगंज तालुक्यातील पत्रकारांचा सत्कार सोहळा आयोजित करण्यात आला.
कार्यक्रमाची सुरुवात आचार्य बाळशास्त्री जांभेकर यांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करून करण्यात आली.
यावेळी आमदार कृष्णा गजबे, न.प. चे माजी उपाध्यक्ष मोतीलाल कुकरेजा, भाजयुमोचे जिल्हाअध्यक्ष चांगदेव फाये, श्रीकांत नागीलवार जिल्हा उपाध्यक्ष, माजी नगर सेवक सचिन खरकाटे, भाजपा शहर महामंत्री सचिन वानखेडे,
विनोद नागपुरकर, उल्हास देशमुख, जगतराम ठेंगरी, उपस्थित होते.
देसाईगंज येथील ज्येष्ठ पत्रकार शाम बारई, प्रेस क्लब सचिव राजरतन मेश्राम, उपाध्यक्ष विलास ढोरे, कार्यकारी संपादक प्रकाश दुबे, पुरुषोत्तम भागडकर, रविंद्र कुथे, घनश्याम कोकोडे, इलियास पठाण, जितेंद्र परसवाणी, दिलीप कहूरके, गौरव नागपुरकर, अरविंद घुटके, अरुण राजगीरे, जाफर शेख, पंकज चहांदे, किशोर मेश्राम आदी पत्रकारांचा शाल, श्रीफळ व पुष्पगुच्छ देऊन सत्कार करण्यात आले.
यावेळी बाळशास्त्री जांभेकर यांची माहिती सांगून, त्यांचा ऐतिहासिक आठवणींना उजाळा देण्यात आला. पत्रकार हा लोकशाहीचा चौथा स्तंभ मानला जातो. आपल्या लेखणीच्या बळावर शोषित वंचित घटकांच्या समस्यांना वाचा फोडणे, भ्रष्टाचाराचे पितळ उघडे पाडून लोकशाहीला बळकट करण्याचे काम हे पत्रकार बांधव करीत असतात. राजकीय असो की सामाजिक कामांबाबत, जनसामान्यांचे समस्या आपल्या लेखणीच्या माध्यमातून शासन प्रशासनाच्या लक्षात आणून देण्याचं काम पत्रकार करीत असतो. असे सूतोवाचन मान्यवरांनी केले.
प्रास्ताविक चांगदेव फाये यांनी केले तर संचालन व आभार विनोद नागपूरकर यांनी मानले.
प्रेस क्लब अध्यक्षांच्या घरीच जाऊन केला सत्कार-
भाजयुमोच्या वतीने आयोजित तालुक्यातील पत्रकारांचा सत्कार समारंभा दरम्यान प्रेस क्लब अध्यक्ष तथा त्रिकालनेत्र या अर्धसाप्ताहिक चे संपादक प्रभातकुमार दुबे यांची मागील एक महिन्यांपासून प्रकृती बरोबर नसल्याचे कळताच आ. गजबे यांनी क्षणाचाही विलंब न करता प्रेस क्लब अध्यक्ष यांच्या घरीच जाऊन प्रकृतीची विचारणा करून शाल, श्रीफळ व पुष्पगुच्छ देऊन सत्कार केला. यावेळी संपादक दुबे मान्यवरांची उपस्थिती पाहून भावुक झाले.
यावेळी न.प. चे माजी उपाध्यक्ष मोतीलाल कुकरेजा, भाजयुमोचे जिल्हा अध्यक्ष चांगदेव फाये, प्रेस क्लब उपाध्यक्ष विलास ढोरे, सचिव राजरतन मेश्राम, पुरुषोत्तम भागडकर, प्रा. दिलीप कहूरके, अरुण राजगीरे, पंकज चहांदे आदी उपस्थित होते.