श्री.अरुण बारसागडे,चंद्रपूर जिल्हा प्रतिनिधी,न्यूज जागर
चिमूर,दि.१८/०१/२०२३
वसंता चौखेचा गुरुदेव सेवा मंडळाने केला जाहीर सत्कार
खडसंगी जवळील खंडाळा येथे राष्ट्रसंत तुकडोजी महाराज यांचा 54 वा पुण्यतिथी कार्यक्रमा प्रसंगी चंद्रपूर च्या वसंता ने खंडाळा येथील गुरुदेव सेवा मंडळाला 1040 स्केअर फूट जागा दान दिली.
भक्ती मार्गाच्या माध्यमातून लोक शिक्षण समाज जाग्रुती, राष्ट्रसेवा साधणारे व परकीय शत्रूच्या विरुध्द क्रांतीचे रणशिंग फुंकनारे युगप्रवर्तक वंदनीय राष्ट्रसंत श्री तुकडोजी महाराज यांचा 54 वा पुण्यतिथी कार्यक्रम विविध कार्यक्रमासह 15 व 16 जानेवारी 2023 ला खंडाळा येथे पार पडला. गावात गुरुदेव सेवा मंडळाला पाहिजे तशी जागा उपलब्ध नाही. यामुळं खंडाळा येथील रहिवासी असलेले वसंता चौखे हे मागील काही कालांतराने खंडाळा गाव हे कायमस्वरूपी सोडून चंद्रपूर ला गेले आता मात्र चंद्रपूर येथील ते कायम रहिवासी झाले असल्याने खंडाळा गावात स्वतःची 1040 स्केअर फूट असलेली जागा विचारात घेऊन खंडाळा येथील गुरुदेव सेवा मंडळाला दान स्वरूपात दिली आहे.
आजच्या युगात थोडी हितभर पण जागा कोणी सोडत नाही. मात्र गावावर असलेले प्रेम पाहता व जागेचा दूरुपयोग होण्यापेक्षा सदुउपयोग व्हावेत यासाठी राष्ट्रसंत तुकडोजी महाराज यांच्या 54 व्या पुण्यतिथी चे औचित्य साधून गावातील गुरुदेव सेवा मंडळाला वसंता चौखे या गुरुदेव भक्तांनी स्वतःची जागा दान स्वरूपात देण्यात आली.
या दिलेल्या जागेवर गुरुदेव सेवा मंडळाचे एक मोठे सभागृह होणार असून पुढील कोणतेही कार्यक्रम सामुदायिक ध्यान साधना केंद्र, प्रार्थना स्थळ या माध्यमातून त्याठिकाणी भव्य वास्तू उभारण्यात येणार असून चांगल्या कामात त्या जागेला महत्व देणार असे खंडाळा गुरुदेव सेवा मंडळाचे अध्यक्ष किशोर गुरले यांनी कळविले आहे
यावेळी 16 जानेवारी 2023 ला ग्रामसफाई, सामुदायिक ध्यान, गावातून रामधुन, दिंडी व भजन, बक्षीस वितरण, सुभाष महाराज यांचे किर्तनाचा कार्यक्रम झाल्यानंतर गुरुदेव सेवा मंडळ करिता जागा दान देणारे दानी वसंतराव नीलकंठ चौखे यांचा जाहीर सत्कार कार्यक्रम करण्यात आला. यासह पत्रकार प्रमोद राऊत, रामटेके ग्रामसेवक, जिल्हा परिषद शाळेचे मुख्याध्यापक, सहाय्यक शिक्षिका, गावातील पोलीस पाटील, गावचे सरपंच तुळसाबाई श्रीरामे आदीसह अनेकांचा शाल श्रीफळ देऊन सत्कार करण्यात आला. व राष्ट्रसंताची प्रार्थना, राष्ट्रवंदना घेऊन काल्याला सुरवात करण्यात आली. त्यानंतर सामूहिक भोजन करून कार्यक्रमाची सांगता करण्यात आली.