गडचिरोली जिल्हा प्रतिनिधी,न्यूज जागर
दि. २३/०१/२०२३ रोजी आदिवासी एकता युवा समिती ची सभा सेमाना देवस्थान गडचिरोली येथे घेण्यात आली. सभेच्या अध्यक्षस्थानी संघटनेचे मावळते अध्यक्ष संजयभाऊ ऊईके हे होते. सभेमध्ये संघटनेची नविन कार्यकारणी गठीत करण्यात आली. यामध्ये उमेशभाऊ ऊईके यांची अध्यक्ष म्हणून सर्वानुमते निवड करण्यात आली तर सचिव पदी प्रदीप कुलसंगे यांची निवड करण्यात आली. अन्य पदाधिकारी म्हणून संघटनेचे उपाध्यक्ष माणिक गेडाम, सहसचिव प्रफुल कोडाप, कोषाध्यक्ष वासुदेव कोडापे, सह कोषाध्यक्ष मंगेश नैताम, कार्याध्यक्ष संजय मसराम, तर सदस्य म्हणून संजय ऊईके, आकाश कोडाप, गिरीष ऊईके, प्रशांत मडावी, सुधिर मसराम, मुकूंदाजी मसराम, रमेश चिकराम आदि ची निवड करण्यात आली. सभेला माजी अध्यक्ष संजय ऊईके, नवनियुक्त अध्यक्ष उमेशभाऊ ऊईके, प्रदीप कुलसंगे, वासुदेव कोडापे, प्रफुल कोडाप, माणिक गेडाम, मंगेश नैताम, संजय मसराम, आकाश कोडापे आदि सदस्य उपस्थित होते.
Umeshbhau Uike selected as a president of Aadiwasi Aikta Yuva Parishad Gadchiroli