श्री.विलास ढोरे,वडसा तालुका प्रतिनिधी,न्यूज जागर
देसाईगंज, दि.०६/०२/२०२३
“अनुभव हे सर्वात मोठं शिक्षण आहे. रा से यो स्वयंसेवकांनी विशेष शिबिराकडे अनुभव शिक्षणाची कार्यशाळा म्हणून बघितलं पाहिजे. ग्रामवासी विपरीत परिस्थितीत कसे जीवन जगतात, अडचणीतून कसे मार्ग काढतात याचं प्रात्यक्षिक शिबिरार्थींना घ्यायला मिळतं. शिबिरार्थींनी चांगल्या गोष्टी हेरून त्या स्वीकाराव्यात व त्या गोष्टींची सवय लावून घ्यावी त्याचे फायदे जीवनभर होतात. शरीर सुदृढतेवर भर देऊन मेहनत करायची सवय लावावी. शिबिरात केलेल्या वा शिकलेल्या गोष्टींचा अंगीकार शिबिरार्थींकडून जीवनात होणे हीच शिबिराची खरी यशस्विता होय” असे अमूल्य विचार मान. श्री एम एन चव्हाण, उपविभागीय वन अधिकारी, वडसा यांनी व्यक्त केलेत. ते नु शि प्र म द्वारा संचालित आदर्श कला वाणिज्य व विज्ञान महाविद्यालयाच्या रा से यो पथकाच्या मौजा गांधीनगर येथे सुदृढ आरोग्यासाठी युवाशक्ती व श्रमसंस्कार शिबिर संकल्पनेवर आधारित महाविद्यालयस्तरीय विशेष शिबिराच्या उद्घाटन प्रसंगी मुख्य मार्गदर्शक म्हणून बोलत होते.
या शिबिराचे उद्घाटन आरमोरी विधानसभा क्षेत्राचे आम. मान. कृष्णाभाऊ गजबे यांचे हस्ते व संस्थाध्यक्ष मान. के जे घोरमोडे यांचे अध्यक्षतेखाली संपन्न झाला. यावेळी संस्था उपाध्यक्ष मान. जगदीशजी शर्मा, संस्था सचिव मान. मोतीलाल कुकरेजा, संस्था सदस्य मान. अब्दुल जहीर शेख मान. नानक कुकरेजा, मान. सौ सपनाताई धाकडे, सरपंच, मान. नेताजी सोंदरकर,उपसरपंच, मान. कालिदास गुरूनुले, अध्यक्ष तं मु समिती गांधीनगर, महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ शंकर कुकरेजा, प्रा डॉ श्रीराम गहाणे, रा से यो गडचिरोली जिल्हा समन्वयक, मान. चक्रधर पारधी, माजी ग्रा पं सदस्य गांधीनगर प्रामुख्याने मंचावर उपस्थित होते. this is the camp sucess when we do work in camp and acceptance that in our life
“भावना व दृष्टी स्वच्छ ठेवून शिबिरार्थींनी ग्रामात जनजागृती करावी. केवळ शरीराने नव्हे तर मनाने शिबिरांत सहभागी झाल्यास शिबिरात सहभागी विद्यार्थ्यांमध्ये श्रमाची आवड निर्माण होईल.” असे विचार आपल्या उद्घाटनिय भाषणात मान. आम. कृष्णाभाऊ गजबे यांनी व्यक्त केलेत व शिबिराच्या यशस्वीतेसाठी शुभेच्छा दिल्यात. “शिबिरार्थींनी सामुदायिक शक्ती व श्रमाचे महत्त्व शिकून त्याचे प्रात्यक्षिक शिबिरात करावे” असे मत मान. जगदीशजी शर्मा यांनी व्यक्त केले. News Jagar
प्रास्ताविक रा से यो कार्य. अधिकारी तथा शिबिर प्रमुख प्रा. निलेश हलामी यांनी केले व शिबिर आयोजनाच्या भूमिकेवर प्रकाश टाकला. शिबिरार्थींनी आपल्या कामातून व वर्तनातून गावकऱ्यांची मने जिंकावीत असे आवाहन प्राचार्य डॉ. शंकर कुकरेजा यांनी आपल्या मार्गदर्शनात केले. शिबिरा दरम्यान शिबिरार्थींना सर्वतोपरी सहकार्य केले जाईल व त्यांच्या श्रमदानातून गावांच्या दीर्घकाल उपयोगाचे काम केले जाईल असे गावचे सरपंच व उपसरपंच यांनी आश्वासित केले.
कार्यक्रमाचे सूत्रसंचालन प्रा. रमेश धोटे यांनी केले तर आभार प्रा.डॉ. राजू चावके यांनी मानलेत. याप्रसंगी बहुसंख्य गावकरी व महाविद्यालयातील सर्व प्राध्यापक वृंद उपस्थित होते.