चामोर्शी तालुका प्रतिनिधी
चामोर्शी,दि.२१/०२/२०२३
स्थानिक जा. कृ. बोमनवार माध्य.विद्यालय तथा विज्ञान व कला कनिष्ठ महाविद्यालय येथे छत्रपती शिवाजी महाराज यांची 393 वी जयंती उत्साहात साजरी करण्यात आली.
‘जय जय महाराष्ट्र माझा ‘ हे राज्यगीत सामूहिक गायन करण्यात आले.
या प्रसंगी कार्यक्रमाचे अध्यक्ष – प्र.प्राचार्य इतेंद्र चांदेकर हे होते,तर प्रमुख अतिथी म्हणून प्रा. नमुदेव कापगते,महेंद्र बुर्लावार, खुशाल कापगते,कल्पना बहिरेवार,स. शि.- घनश्याम मनबत्तूलवार,अशोक गजभिये व सर्व शिक्षक , शिक्षिका वृंद उपस्थित होते.
अध्यक्ष ,अतिथीनी महाराजांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करुन,द्वीप प्रज्वलन करून आदरांजली अर्पण केली.
उपस्थित कर्मचाऱ्यांनी महाराजांच्या प्रतिमेला पुष्प अर्पण केले. मान्यवरांनी शिवाजी महाराजांच्या जीवन कार्यावर मार्गदर्शन केले.newsjagar
अध्यक्षांनी छत्रपती शिवाजी महाराज यांचे कार्य प्रेरणादायी असल्याचे प्रतिपादन केले.
संचालन – प्रा.निमेश उरकुडे तर आभार प्रदर्शन – स शि.मृणाल तुमपल्लीवार यांनी केले.
या प्रसंगी प्राध्यापक,प्राध्यापिका,शिक्षक,शिक्षिका, शिक्षकेत्तर कर्मचारी विद्यार्थी उपस्थित होते.