नगर पंचायतच्या चार विषय समिती निवडणुक अविरोध

श्री.नंदकिशोर वैरागडे ,विशेष प्रतिनिधी गडचिरोली जिल्हा ,न्यूज जागर 

कोरची,दि.२१/०२/२०२३

अपक्ष व राकाच्या साथीने काँग्रेसची सरशी

उच्च विद्या भूषित नगरसेवकांना डावलल्याने नाराजीचा सूर

कोरची येथील नगरपंचायत विषय समिती सभापती पदाची मुद्दत संपल्यामुळे 21 फरवरीला विषय सभापतीपदाची निवडणूक घेण्याकरिता नगर पंचायत सभागृहात सभेचेआयोजन केले होते. त्यात काँग्रेसला राष्ट्रवादीची व अपक्ष साथ मिळाल्याने या सभेत विषय समितीच्या सर्व सभापतीची अविरोध निवड करण्यात झाली

मागील वर्षी २१ फरवरी २०२२ रोजी नगर पंचायत च्या विषय समिती निवडणूक घेण्यात आली सर्व चार सभापतींची निवड अविरोध निवड झाली होती यांच्या पदाची मुद्दत संपली असल्याने २1 फरवरी२०२३ रोजी १० ते ११ वाजता विषय समिती बांधकाम, स्वच्छता, पाणी पुरवठा व महीला बालकल्याण या सभापती उपसभापती पदासाठी प्रत्येकी ऐक ऐक नामांकन दाखल करण्यात आले होते.

दुपारी तीन वाजता दर्शन निकाळजे पिठासिन अधिकारी तथा उपविभागीय अधिकारी कुरखेडा व सोमनाथ माळी पिठासिन अधिकारी तथा मुख्याधिकारी नगर पंचायत कोरची बाबाराव हाके आदीच्या उपस्थित पार पडलेल्या विषय समितीच्या विशेष सभेत अपक्ष नगरपंचायत उपाध्यक्ष हीरा राऊत यांची दुसऱ्यांदा स्वच्छता , वैद्यक व आरोग्य सभापती पदी तर काँग्रेसचे बांधकाम सभापती पदी म्हणून सो निरा बघवा यांची , तर पाणी पुरवठा व जल निस्तारन सभापती म्हणून राष्ट्रवादीचे सुनंदा कुमरे तर. महीला व बाल कल्याण सभापती म्हणून काँग्रेस च्या कौशल्या कैवास यांची अविरोध झाली असल्याचे जाहीर करण्यात आले. newsjagar
याप्रसंगी नगराध्यक्ष हर्षलता भैसारे , उपाध्यक्ष हीरा राऊत, मनोज अग्रवाल आदी उपस्थित होते