पोष्टीक तृणधान्य काळाची गरज असल्याने प्रसार आणि प्रसिद्धी रॅली चे आयोजन

श्री.विलास ढोरे,वडसा तालुका प्रतिनिधी 

देसाईगंज,दि.२४/०२/२०२३

मौजा आमगाव येथे 23 फेब्रुवारी 2023 रोजी आंतरराष्ट्रीय पोष्टीक तृणधान्य वर्ष – 2023 निमीत्य पोष्टीक तृणधान्य आहारातील काळाजी गरज लक्षात घेता प्रचार प्रसीदो करण्यासाठी महाराष्ट्र शासन कृषि विभागामार्फत जिल्हा परीषद उच्च प्राथमीक केंद्र शाळा आमगाव येथून रॅली काढन्यात आली.newsjagar
यावेळी सरपंचा सौ. प्रेमलता बोदेले, शाळा व्यवस्थापण समीतीच्या अध्यक्षा सौ. वैशालीताई नाकतोडे, मंडल कृषि अधिकारी वि.ए. देशमुख, मुख्याध्यापक शेंद्रे सर, क्रुषी सहाय्यक कु. बि.ए. दमकोंडावार व शिक्षक यांनी सहभाग दर्शविला.
तृणधान्य मानवी आरोग्यासाठी कसे फायदेशीर आहे पटवून देण्यासाठी जनजागृती रॅली काढण्यात आली. शेतकऱ्यांनी शेतामध्ये पिकात फेरबदल करून ज्वारी, बाजरी, नाचणी, राजगीरा, कोदी यासारख्या कमी पाण्यामध्ये येणाऱ्या रब्बी हंगामातील पिकाच्या लागवड करून क्षेत्रात वाढ करावी पर्यायाने गावातील लोकांच्या आहारामध्ये तृणधान्याचे प्रमाण वाढून आरोग्य उत्तम राखले जाईल.
तांदुळ व गहू याचा प्रामुख्याने रोजच्या आहारात वापर होत असल्यामुळे हृदयविकार, मधुमेह, उच्च रक्तदाब अशाप्रकारचे आजार खुप जास्त प्रमाणात नागरीकांमध्ये भेडसावत आहेत त्यामुळे याचा वापर आहारात वाढविण्या- च्या दृष्टीने अंतरराष्ट्रीय पातळीवर याची दखल घेतली जात आहे. रैलीच्या माध्यमातुन शाळेतील विद्याध्यानी घोषवाक्याच्या स्वरुपातून आरोग्याचे मंत्र रूजवीले शालेय विद्यार्थानी अल्पोपलर राजगीरा लाडू वाटपाने कार्यक्रमाची सांगता केली.