श्री.अमित साखरे,गडचिरोली जिल्हा प्रतिनिधी,न्यूज जागर
चामोर्शी,दि.०२/०३/२०२३
चामोर्शी येथील निशिगंधा इंग्लिश स्कूल मध्ये इयत्ता सहावीच्या विद्यार्थी कु.हिमांशी प्रमोद गव्हारे , कु. श्रुती संदीप गडे, अंश कवडू नन्नावरे यांनी इयत्ता पाचवीच्या पूर्व उच्च प्राथमिक शिष्यवृत्ती परीक्षा 2022 मध्ये यश संपादन केले आहे. या तीनही विद्यार्थ्यांनी शिष्यवृत्ती परीक्षेमध्ये गुणवत्ता प्राप्त केल्याने ते शिष्यवृत्तीस पात्र ठरले आहेत यामुळे या सर्व विद्यार्थ्यांचे स्कूलच्या प्राचार्या संचालिका वालदे , शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी यांनी कौतुक केले.newsjagar



