चामोर्शीत मोबाईलद्वारे घरपोच दारू पुरवठा, गावात सर्रास अवैद्य दारूविक्री, पोलिसांचे दुर्लक्ष

श्री.प्रदीप वाळके, मुख्यसंपादक न्यूज जागर 

चामोर्शी,दि.०२/०३/२०२३

गडचिरोली जिल्ह्यात दारुबंदी असली तरी चामोर्शी तालुका परिसरात दारुबंदी आहे की सुरू आहे हे कळायला मार्ग नाही.चामोर्शी परिसरात काही दारूमाफिया गेल्या काही दिवसापासून खूलेआम दारूची तस्करी करित असून लहान आणि खेड्यातील विक्रेत्यांना त्यांच्याकडून दारूचा मुबलक पूरवठा केला जात आहे. illegal liquor business in chamorshi

तालुक्यात दारूविक्रिच्या प्रमाणात मोठी वाढ झाल्याचे चित्र दिसुन येत आहे. चामोर्शी येथे 24 तास दारूचि खुलेआम विक्रि सुरु असते. दारू माफ़ीयांकडून चिल्लर दारू विक्रेते दारू विकत घेऊन ति दूप्पट भावाने राजरोसपने विकत आहेत. ग्राहकाला बोलाऊन दारूची विक्रि केली जात आहे. काही युवा वर्ग तर मोबाईलवरुन दारूची आर्डर घेतात व घरपोच सेवाही देत आहेत. सध्यातरी जो मागेल जिथे मागेल तिथे दारू पुरविली जाते.याची माहीती पोलिसांना आहे. मात्र पोलिस मूग गिडून गप्प बसले आहेत ?  पोलिसांचे सहकार्य असल्याशिवाय दारू माफिया व चिल्लर दारू विक्रेते हे खूलेआम धंदा कसे काय करू शकतात ? हा प्रश्नच आहे. दिवसेंदिवस चिल्लर दारू विक्रेत्यांची संख्या वाढत आहे , त्यांच्यात आता स्पर्धा सुरु झाली आहे.newsjagar 

पोलिस व दारू विक्रेत्यांमध्ये नेहमि बैठका होत असल्याचेही बोलले जाते. चामोर्शी येथील दारू माफ़ीयांनी काही दिवसातच स्वताच्या चारचाकी गाड्या घेऊन दारूची तस्करी करीत आहेत . या  दूप्पट कमाई असल्यामुडे तरुण व महीला वर्गही या व्यवसायाकडे मोठ्या प्रमानात वळत असल्याचे चित्र दिसत आहे. 

चामोर्शी शहरात आणि आजूबाजूच्या खेड्या गावात दारूचा महापूर वाहत आहे. मात्र पोलीस प्रशाशनाकडून काहीच पाऊल ऊचलले जात नसल्याने पोलिसांच्या कार्यप्रणालीवर शंका व्यक्त केल्या जात आहे, जुने तहसील कार्यालय घोट रोड येथे तर परवानाधारक बार च असल्याचे चित्र दिसून येते, तर हि दारू डुप्लिकेट तर नाही  ? अशीही शंका वर्तविण्यात येत आहे , यापूर्वी सुद्धा परिसरात डुप्लिकेट दारू चे प्रकरण आढळून आले आहेत.

वरिष्ठ पोलिस अधिकार्याँनी याकडे लक्ष देऊन अवैद्य दारू विक्रेत्यांवर कार्यवाही करावी अशी मागनी नागरिकांकडून होत आहे.

पोलीस स्टेशन चामोर्शी चे ठाणेदार श्री.राजेश खांडवे साहेब यांचेशी संपर्क साधला असता त्यांनी चार्ज घेतल्यापासून जवळपास ८० केसेस केलेल्या आहेत,तसेच सर्व प्रकारावर लक्ष ठेऊन त्यावर उचित कार्यवाही केली जाईल,यात कुठलीही हयगय केली जाणार नाही,असे कळविले आहे.