प्राथमिक शिक्षक समितीचे वतीने दिव्यांग विद्यार्थ्यांना बिस्किटे व फळ वाटप.

Froot-distribution-for-students
Froot-distribution-for-students

श्री.अमित साखरे,गडचिरोली जिल्हा प्रतिनिधी,न्यूज जागर

चामोर्शी,दि.०२/०३/२०२३

जिल्हा परिषद गडचिरोली अंतर्गत चामोर्शी तालुक्यामध्ये स्वावलंबन या ऑनलाईन प्रणालीवर नोंदणी करण्यात आलेल्या पात्र दिव्यांग व्यक्तींना स्वावलंबन प्रणालीद्वारे ऑनलाईन दिव्यांगत्व प्रमाणपत्र आणि वैश्विक ओळखपत्र (UPID CARD) देण्यासाठी तपासणी व निदान विशेष मोहीम कार्यक्रमांतर्गत दिनांक 2 मार्च 2023 रोजी ग्रामीण रुग्णालय चामोर्शी या ठिकाणी शिबिर आयोजित करण्यात आले होते. या शिबिरात उपस्थित सर्व दिव्यांग व्यक्तींना व त्यांचे नातेवाईकांना प्राथमिक शिक्षक समिती चे वतीने बिस्किटे व फळांचे वाटप करण्यात आले. या प्रसंगी गटविकास अधिकारी सागर पाटील, तालुका आरोग्य अधिकारी प्रफुल्ल हुलके, सहाय्यक गटविकास अधिकारी भीमराव व्हनखंडे, प्राथमिक शिक्षक समितीचे पदाधिकारी राजेश बाळराजे, पुरुषोत्तम पिपरे, ओमप्रकाश साखरे, संतोष लाजूरकर, मोरेश्वर भैसारे इत्यादि उपस्थित होते. newsjagar