आनंद नगर नवेगाव येथे शहिद वीर बाबुराव शेडमाके जयंती साजरी

न्युज जागर वृत्तसेवा 

गडचिरोली,दि.१२/०३/२०२३

गडचिरोली तालुक्यातील नवेगाव येथे आदिवासी गोंडवाना गोटुल समिती नवेगांव/ मुरखळाच्या वतीने गडचिरोली जिल्ह्यातील प्रथम शहिद वीर बाबुराव शेडमाके यांची १९० वी जयंती मोठ्या उत्साहाने साजरी करण्यात आली. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी समितीचे अध्यक्ष यशवंत नैताम हे होते. तर उद्घाटक म्हणून शहिद वीर बाबुराव शेडमाके स्मारक समितीचे अध्यक्ष वसंतराव कुलसंगे हे होते. प्रमुख पाहुणे म्हणून अखिल भारतीय युवा विकास परिषदेचे गडचिरोली जिल्हाध्यक्ष कुणाल कोवे, आदिवासी एकता युवा समिती गडचिरोली चे अध्यक्ष उमेशभाऊ ऊईके, समितीचे सचिव साईनाथ पुंगाटी, मालता पुडो, अर्चना टेकाम, विनोद दुग्गा, सचिन भलावी, जुमनाके सर, बिस्वास सर, रामदास सुरपाम, भुमक पेंदामजी, आदि उपस्थित होते.newsjagar

सर्व प्रथम प्रमुख मान्यवरांच्या हस्ते झेंडा पुजन करुन वीर थोर पुरूषांना हार अर्पण करण्यात आले. सर्व मान्यवरांनी शहिद वीर बाबुराव शेडमाके यांच्या जिवनावर प्रकाश टाकुन समाजातील नागरिकांनी त्यांचा आदर्श अंगीकारण्याचे आहवान केले. कार्यक्रमाचे प्रास्ताविक हरिशचंद्र कन्नाके यांनी केले तर संचालन सदाशिव नरोटे व आभार दिवाकर पेंदोर सर यांनी मानले. कार्यक्रमास समितीचे सुमन वाच्चामी, नयना पोटावी, छाया आत्राम, शामलता पदा, स्वाती नैताम, पोर्णिमा कुलसंगे, विद्या दुग्गा, तुषार मडावी, विजय बनकर, धिरज जुमनाके, सत्रो कोराम, लिला ईष्टाम, सुरेखा मडावी, भावना मडावी, जलमशाह मडावी, शामराव पेंदोर, देवाजी मडावी, गंगाधर गेडाम, वासुदेव कोडापे, रिंगुराम पोटावी सह आनंद नगर नवेगाव येथील शेकडो नागरिक उपस्थित होते.