श्री.नंदकिशोर वैरागडे,विशेष प्रतिनिधी गडचिरोली जिल्हा ,न्यूज जागर
कुरखेडा,दि.१५/०३/२०२३
डी.के. महिला महाविद्यालय येथे बायोलॉजी विभागाअंतर्गत व्याख्यानाचे आयोजन करण्यात आले होते. कार्यक्रमाच्या विशेष अतिथी व प्रमुख मार्गदर्शक म्हणून ब्रम्हपुरी येथील कवयित्री, लेखिका प्रा. डॉ. सुकेशिनी बोरकर होत्या तर, अध्यक्षस्थानी महाविद्यालयाच्या कार्यकारी प्राचार्या डॉ. पल्लवी तागडे तर प्रमुख पाहुण्या म्हणून प्रा. डॉ. अरुणा शेंडे उपस्थित होत्या. कार्यक्रमाच्या व्याख्याता कवयित्री, लेखिका प्रा. डॉ. सुकेशिनी बोरकर यांनी आधुनिक महिलांसमोरील आव्हाने व त्यांची भूमिका या विषयावर मार्गदर्शन केले व स्वतःच्या काव्यसंग्रहातील कविता सादर केल्या. कार्यक्रमानंतर विद्यार्थिनींसाठी जागतिक महिला दिन वर आधारित मेहंदी स्पर्धेचे आयोजन करण्यात आले. त्यामध्ये विद्यार्थिनींनी उत्स्फूर्तपणे सहभाग घेतला. कार्यक्रमाला प्रा. एन. एम. घाटबांधे, डॉ. पी. ए. सांगोळे, प्रा.एस. बी. शेंडे उपस्थित होते. सूत्रसंचालन प्रा. बोरकर यांनी केले. कार्यक्रमाला महाविद्यालयातील सर्व प्राध्यापक, शिक्षकेत्तर कर्मचारी वृंद व विद्यार्थिनी उपस्थित होत्या.newsjagar


