बुलढाणा जिल्हा प्रतिनिधी,न्यूज जागर
शेगाव,दि.१६/०३/२०२३
शेगांव पुरवठा विभागाचे भ्रष्टाचारी कर्मचारी अधिकारी च्या विरुद्ध निलंबनाची कारवाई करणेबाबत लवकरच तक्रार दाखल
मागील पाच वर्षापासुन बुलढाणा जिल्हयातील (शेगांव तालुका) माटरगांव येथील गोरगरीबांना राशन कार्ड देऊन सुद्धा धान्यापासुन वंचित ठेवण्यात आले होते. तेव्हा माटरगांव च्या लोकांनी आदर्श मीडिया एसोसीएशन तसेच अंतरराष्ट्रिय मानव अधिकार कम्युनियन भारत या ट्रस्ट कडे निवेदन दिले होते. निवेदन प्राप्त होताच प्रियाताई झांबरे व युवराज गजभिये यांनी शेगांव तहसील कार्यालय ते अन्न व पुरवठा विभागाचे अपर सचिव मुंबई मंत्रालय पर्यंत पाठपुरावा केला आणी जे गरीब लोक मागील पाच वर्षापासुन धान्यापासुन वंचित राहीले होते त्यांना धान्य मिळवुन देण्यात मदत केली.
प्रियाताई झांबरे म्हणतात की पाठपुराव्या दरम्यान सरकारी कर्मचारी, अधिकारी व राशन दुकानदार यांचे अनेक भ्रष्टाचार समोर आले आहेत. शेगांव पुरवठा विभागाचे कर्मचारी अधिकारी हे माटरगांव येथील ६ वर्षीय बालकाच्या नावाचा गैरवापर करुन माटरगांव येथील सिंगन परिवाराच्या राशन कार्ड वर ६ वर्षीय बालकाचे नाव कार्ड प्रमुख म्हणुन टाकले असल्याचा झांबरे यांचेकडे पुरावा आहे तसेच शेगांव च्या शर्मा यांच्या राशन कार्ड मध्ये पुरुषोत्तम खंडारे यांच्या पत्नी च्या नावाचा गैरवापर करुन खंडारे यांच्या पत्नीला शर्मा परिवारांतील कार्ड प्रमुख म्हणुन नोंद घेतली असल्याचे समोर आले. शेगांव चे कर्मचाऱ्यांनी आँनलाईन रेकार्ड डिलेट सुद्धा केले आहे. असे बेजवाबदार काम करणाऱ्या कर्मचाऱ्यांना निलंबित करण्याची मागणी तक्रारीच्या माध्यमातुन मुख्य सचिव मुंबई मंत्रालय व पुरवठा विभागाचे अपर सचिव विजय वाघमारे यांचे कडे लवकरच करण्यात येईल असे प्रियाताई झांबरे यांनी सांगीतलेnewsjagar