स्वस्त धान्य दुकानदार यांना आम आदमी पार्टी चे समर्थन

श्री. भुवन भोंदे, प्रतिनिधी,न्यूज जागर 

देसाईगंज,२१/०३/२०२३

वडसा इथून स्वस्थ धान्य दुकानदार दिल्लीला आंदोलणासाठी रवाना झाले. 

राज्य सरकारकडून राज्यातील 55 हजार स्वस्त धान्य दुकानदारांच्या मागण्या, अडचणी, समस्या  या वर विचार विनिमय  करण्यासाठी  अखिल महाराष्ट्र स्वस्त धान्य दुकानदार संघनेचे जिल्हा अध्यक्ष राज्यपादाधिकारी यांना अन्न, नागरी पुरवठा, विभागातील मंत्री महोदय व अधिकारी यांच्या समवेत बैठक बोलावण्यात आली  व राज्य. स्तरावरील प्रलंबित मागण्या मार्गी लावावे या मागणीसाठी दि.२२ मार्च २०२३ रोजी दिल्ली येथे रामलीला मैदानावर संसदेवर मोर्चा काढण्यात येत आहे. याकरिता  राजभरातील स्वस्त धान्य दुकान परवाना धारक दिल्लीला रवाना झाले , देसाईगंज तालुक्यातूनसुद्धा स्वस्त धान्य दुकानदार संघनेचे पदाधिकारी,व तालुक्यातील दुकानदार  दिल्ली रामलीला मैदान येथे आंदोलनासाठी रवाना झाले व त्यांना आम आदमी पार्टी  देसाईगंज पार्टी तर्फे जिल्हा उपाध्यक्ष  श्री.प्रकाशजी जीवनी यांचे नेतृत्वात समर्थन देण्यात आले त्यावेळी आम आदमी पार्टी चे कार्यकर्ता, वामनजी पगाडे, तालुका अध्यक्ष भरत तहलांनी, टिकेश कामडी, तबरेक खान, अतुल ठाकरे, शेखर बारापात्रे, सौरभ साखरे, आदी उपस्थित होते. NEWS JAGAR