गडचिरोली,दि.०१/०४/२०२३
दि. २९/०३/२०२३ ला आदिवासी एकता युवा समिती गडचिरोली च्या वतीने मा. जिल्हाधिकारी संजय मीना यांच्या कक्षात संघटने तर्फे दि. ११/०३/२०२३ ला गोंडवाना विद्यापीठाला शहिद वीर बाबुराव पुल्लेसुर शेडमाके गोंडवाना विद्यापीठ असे नामविस्तार करण्यात यावे या मागणी सह अन्य १३ मागण्यान संदर्भात १ दिवसीय धरणे आंदोलन घेण्यात आले होते. त्या अनुषंगाने आज आदिवासी एकता युवा समिती गडचिरोलीचे अध्यक्ष उमेशभाऊ ऊईके व आदिजन चेतनेचा जागर चे प्रा. अशोक तुमराम सर यांच्या नेतृत्वाखाली मा. जिल्हाधिकारी यांचे सोबत चर्चा करण्यात आली. यावेळी आदिवासी एकता युवा समितीचे मंगेश नैताम, मुकुंदा मेश्राम, संजय मेश्राम, आकाश कोडाप, प्रफुल कोडाप, प्रियदर्शन मडावी, बाबुराव स्मारक समितीचे गुलाबराव मडावी, आदिवासी गोंडवाना गोटुल समिती मुरखळा/नवेगाव चे सचिव साईनाथ पुंगाटी, उपाध्यक्ष मालता पुडो, आदिवासी एकता युवा समिती मसली चे सचिव सुरेश मेश्राम, कोषाध्यक्ष बंडु रायसिडाम, मधुकर कोडापे, गोकुल मेश्राम, वामन गणवीर आदि उपस्थित होते.