श्री.अरुण बारसागडे,चंद्रपूर जिल्हा प्रतिनिधी,न्युज जागर
सावरगाव,दि.०९/०४/२०२३
नागभीड तालुक्यातील ग्राम पंचायत वाढोणा अंतर्गत येत असलेल्या मौजा सोनापुर तुकुम येथिल नळ पाणी पुरवठा योजनेचा भुमिपुजन सोहळा सरपंच श्री. देवेंद्र प्रेमदास गेडाम यांचे हस्ते संपन्न झाला.
ग्रामीण पाणी पुरवठा विभाग जिल्हा परिषद चंद्रपुर जलजिवन मिशन कार्यक्रम अंतर्गत नळ पाणी पुरवठा मौजा सोनापुर तुकुम येथे सुमारे 41.63 लक्ष रुपये निधी मंजूर करुन घेण्यात आलेले असुन याद्वारे नागरिकांना नियमित स्वच्छ पिण्याच्या पाण्याचा पुरवठा होणार आहे. या नळ पाणी पुरवठा योजनेचा भुमिपुजन सोहळा वाढोणा ग्राम पंचायत चे सरपंच श्री. मा. देवेंद्र प्रेमदास गेडाम यांचे हस्ते संपन्न झाला. यावेळी श्री. भगवान बन्सोड उपसरपंच, सौ. उषा पाटील, सौ. शशिकला ठाकरे, सौ. मंगला बोरकर, सौ. मिनाक्षी कोमावार, श्री. वासुदेव मस्के, श्री. अनिल डोर्लीकर, श्री. प्रदिप येसनसुरे आदी ग्राम पंचायत सदस्य, ग्राम पंचायत चे कर्मचारी वृंद व गावकरी मोठ्या प्रमाणात उपस्थित होते.