श्री.अरुण बारसागडे ,चंद्रपूर जिल्हा प्रतिनिधी ,न्युज जागर
सावरगाव,दि.१२/०४/२०२३
नागभीड तालुक्यातील वाढोणा येथील ग्रामपंचायत कार्यालयात क्रातीसुर्य महात्मा ज्योतीबा फुले यांची 196 वी जयंती साजरी करण्यात आली.
सर्वप्रथम क्रातीसुर्य महात्मा ज्योतीबा फुले यांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करुन अभिवादन करण्यात आले. व महात्मा ज्योतीबा फुले यांचे जयंतीचे औचित्य साधून ग्रामपंचायतच्या स्वनिधीतुन 5 टक्के अपंग कल्याण निधीतून श्री. अक्षय खोब्रागडे, सचिन लांजेवार, बंडु कंकलवार, अशोक कंकलवार यांना थंड पाण्याच्या कँन देण्यात आल्या व सोबतच 67 अपंग लाभार्थांना थंड पाण्याची कॅन वाटप करण्यात आले.
यावेळी ग्राम पंचायत चे सरपंच देवेंद्र गेडाम, उपसरपंच भगवान बन्सोड, ग्रा. पं. सदस्य अनिल डोरलीकर, प्रदीप येसनसुरे, रामेश्वर लेबेवार, वासुदेव मस्के, ग्रा. पं. सदस्यां मंगला बोरकर, शशिकला ठाकरे, उषा पाटील, मीनाक्षी कोमावार, प्रियका गंजेवार, आदी ग्रामपंचायत कर्मचारी व गावातील अपंग व्यक्ती उपस्थित होते.