श्री.अरुण बारसगडे,चंद्रपूर जिल्हा प्रतिनिधी,न्युज जागर
मूळ,दि.२५/०४/२०२३
विवाहित प्रियकराचे विवाहित महिलेशी असलेल्या प्रेमप्रकरणामुळे प्रेयसीच्या अंगावर पेट्रोल ओतून तिला जाळण्याचा प्रयत्न केला तर स्वतः घरी येऊन गळफास घेऊन आत्महत्या केल्याची खळबळजनक घटना २४ एप्रिल सोमवार रोजी दुपारी दोन वाजताच्या सुमारास मूल शहरात घडली.
बंडू उर्फ रामचंद्र निमगडे वय 45 वर्ष रा. वार्ड क्र. 11, मूल असे विवाहित प्रियकराचे नाव आहे. Attempt to Murder & Suicide Mystery
बंडू निमगडे विवाहित असून त्याला एक मुलगा आहे त्याचे तेथिलच एका महिलेशी बऱ्याच दिवसांपासून विवाहबाह्य संबंध होते त्या महिलेलाही एक मुलगा आहे. यांचे प्रेमप्रकरण जगजाहीर झाल्याने बंडू निमगडे च्या घरात नेहमीच वादविवाद व्हायचे याला कंटाळून रागाच्या भरात बंडू ने प्रेयसी महिलेच्या अंगावर पेट्रोल ओतून तीला जाळण्याचा प्रयत्न केला त्यानंतर स्वतःच्या घरात गळफास घेऊन आत्महत्या केली. Attempt to burn by pouring petrol And suicide by hanging at home
महिलेला पोलिसांनी मूल उपजिल्हा रुग्णालयात प्राथमिक उपचार करून पुढील उपचारासाठी चंद्रपूर सामान्य रुग्णालयात हलविण्यात आले आहे. Mul Police Station
घटनेचे गांभीर्य लक्षात घेता घटनास्थळी पोलीस अधीक्षक SP Visit यांनी भेट दिली.
पेट्रोल टाकून खुनाचा प्रयत्न केल्याप्रकरणी पोलिसांनी मृत बंडू उर्फ रामचंद्र निमगडे विरुद्ध 307 अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला तसेच आत्महत्या प्रकरणी मर्ग दाखल करण्यात आला आहे.newsjagar
पुढील तपास मूल पोलीस ठाण्याचे प्रभारी ठाणेदार बन्सोड करीत आहेत.




