श्री.अरुण बारसागडे,चंद्रपूर जिल्हा प्रतिनिधी,न्युज जागर
तळोधी बा.दि,२६/०४/२०२३
नागभीड तालुक्यातील सावरगाव येथील आदिवासी सेवा सहकारी सोसायटीमध्ये उन्हाळी धान्याची फसल घेणारे शेतकरी रात्रभर सोसायटीमध्ये रात्र जागून काढत असून शासन व स्थानिक संस्थेच्या चुकीच्या धोरणामुळे शेतकऱ्याना मनस्ताप सोसावा लागत असल्याचा आरोप शेतकऱ्याकडून होत आहे.
नागभिड तालुक्यात शेतकरी मोठ्या प्रमानात धानाची लागवड करतात . त्यात सावरगाव परिसर अग्रेसर आहे .आधीच शेतकरी शेती करताना तारेवरची कसरत करावी लागत असते शेतात उत्पादन होऊनही शासनाच्या चुकीच्या धोरणामुळे “पिकला तर विकत नाही, व विकला तर भाव नाही , आणि भाव नाही तर शेतकर्यांच्या गतीला पारावार नाही ” म्हणजेच शेतकऱ्यांचा वाली कोणी नाही फक्त निवडणूक असली की सर्वच विविध अस्वासने देऊन वेळ मारून नेतात व याच्यातच “बळी तो कान पिळी ” अशी परिस्थीती शेतकऱ्यांची होऊन जाते.newsjagar
आदिवासी सेवा सहकारी संस्था सावरगाव येथे कार्यरत आहे या सोसायटी अंतर्गत जवळपास चार गाव येत असून त्यात सावरगाव ,चिखलगाव ,वलनी मेंढा, चारगाव , या सर्वच गावामध्ये शेतकऱ्यांनी शासनावर अवलंबून न राहता स्वतः शेतात लाखो रुपये खर्च करून बोरवेलची सोय करून घेतली व आपल्या शेतात उत्पन्न वाढवून आपली आर्थिक परिस्थिती कशी वाढेल यासाठी प्रयत्नरत आहेत. परंतु शासनाच्या व संस्थेच्या चुकीच्या धोरणामुळे शेतकऱ्यांना मनस्ताप सोसावा लागत आहे.
नागभीड तालुक्यातील इतर सोसायटीचे सर्वच सातबारा ऑनलाईन पूर्ण झाले परंतु सावरगाव या सोसायटीचे सातबारे त्यांचे चुकीचे धोरणामुळे ऑनलाईन होऊ शकले नाही आणि याचा त्रास शेतकऱ्यांना रात्र जागून काढावी लागत आहे . दी.२४..एप्रिल रोजी गावागावात दवंडी देण्यात आली व त्या रात्रीपासून शेतकरी ऑनलाईन करण्यासाठी संस्थेत रात्र जागून रांगेत लागून आहेत .
शेतकऱ्यांचा त्रास वाचविण्यासाठी आदिवासी सेवा सहकारी संस्थेने यापूर्वीच जर सातबारे गोळा करून ऑनलाईन केले असते तर एवढा त्रास शेतकऱ्यांना झाला नसता यासाठी येतील प्रशासन जबाबदार व यांचा भोगळ कारभार आहे.
दिवाकर ऋषिजी ठीकरे शेतकरी सावरगाव
ऑनलाईन करण्यासाठी लाईनमध्ये लागण्याची व रात्रभर जागण्याची काही एक गरज नाही शेतकऱ्यांनी दिवसभरात सातबारा जमा करून ऑनलाईन करून घेतली तरी होत असते .
मा. प्रेमदास सडमाके व्यवस्थापक
सेवा सहकारी संस्था सावरगाव