विद्यार्थ्यांनी व्यसनाधीनतेच्या आहारी न जाता आपल्या ध्येयाची नशा करावी

विद्यार्थ्यांनी व्यसनाधीनतेच्या आहारी न जाता आपल्या ध्येयाची नशा करावी
पोलीस निरीक्षक सुमित परतेकी
मुल – समाजात व्यसनाधीनता वाढत असून यात तरुण पिढीही गारद होत असतानाच विद्यार्थीही नशेच्या आहारी जात असल्याचे वास्तव आहे. हे चिंतनीय बाब असून विद्यार्थ्यांनी व्यसनाधीनता टाळावी प्रत्येकाने आपापल्या करिअर कडे लक्ष द्यावे. ध्येय ठरवून त्यात ध्येयाचा पाठलाग करावा व यश संपादन करावे विद्यार्थ्यांनी नशाच करायची असेल तर ध्येयाची नशा करावी. असे प्रतिपादन मूल पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक सुमित परतेकी यांनी भेजगाव येथील शरदचंद्र पवार विद्यालय तथा कनिष्ठ महाविद्यालयात परिवहन समितीच्या बैठकीदरम्यान विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करताना केले.
सदर कार्यक्रम सोमवार दिनांक 13 रोजी दुपारी आयोजित करण्यात आला. या कार्यक्रमाचे अध्यक्ष म्हणून महाविद्यालयाच्या प्राचार्या भारती मोटघरे तर विशेष मार्गदर्शक म्हणून पोलीस निरीक्षक सुमित परतेकी, पोलीस उपनिरीक्षक उत्तम कुमरे, पोलीस पाटील शशिकांत गणवीर, शाळा व्यवस्थापन समितीचे उपाध्यक्ष रवींद्र शेट्टे आदी मंचावर उपस्थित होते.
ठाणेदार सुमित परतेकी यांनी पुढे बोलताना वाहतुकीचे नियम सांगत ते पाळत अपघात टाळण्याचे आवाहन केले. तर विकृत मानसिकता व त्यातून उद्भवणारी गुन्हेगारी प्रवृत्ती ही समाजाला लागलेली कीड असून याचा समूळ उच्चाटनासाठी लोकसहभागातून सामाजिक प्रयत्न करणे गरजेचे असल्याचे प्रतिपादन त्यांनी यावेळी केले.
कार्यक्रमाचे यशस्वी संचालन श्रावण बोरकर तर प्रस्ताविक अरविंद जेंगठे तर आभार प्रकाश जमदाळ यांनी मानले कार्यक्रमाच्या यशस्वी ते करिता विद्यालयातील शिक्षक व शिक्षकेतर कर्मचाऱ्यांनी परिश्रम घेतले.