तळोदी बाळापुर पोलीस स्टेशन कर्मचाऱ्यांद्वारे मॉकड्रील आणि रूट मार्च

अरुण बारसागडे , नागभीड तालुका प्रतिनिधी न्यूज जागर 

तळोदी बाळापुर पोलीस स्टेशनच्या वतीने पोळा व गणेशोत्सव सन -2022 पोलीस स्टेशन तळोधी हद्दीत सदर सण/उत्सव शांततेत पार पडण्याचे दृष्टीकोनातुन सकाळी 11;50 वाजता पोलीस स्टेशनचे समोरिल खुल्या परिसरात माप ड्रिल सराव घेण्यात आला.

हा सराव मिलिंद शिंदे उप विभागिय पोलीस अधिकारी, ब्रम्हपुरी यांचे उपस्थितीत तसेच पोलीस स्टेशन तळोधी येथिल सहाय्यक पोलीस निरीक्षक  डी.आर.शेंडे, 13 पोलीस अंमलदार आणि 09 होमसैनिक यांचेसह पोलीस स्टेशनचे समोरिल खुल्या परिसरात मॉक ड्रिल सराव घेण्यात आला.

लागलीच उपस्थित पोलीस अंमलदार तसेच होमगार्ड सह तळोधी शहरातील गणेश विसर्जन मार्ग -जुना बसस्टॅण्ड चौक, प्रकाश किराणा चौक, बाजार चौक, मस्जिद् चौक, गोवर्धन चौक, बामनि चौक, झेंडा चौक मेन रोड मार्गाने दाट मिश्र वस्तितुन मा. मिलिंद शिंदे,उप विभागिय पोलीस अधिकारी ब्रम्हपुरी यांचे उपस्थितीत तळोधी बा.पोलीस स्टेशन ते गाव परिसरात 1;35 वाजता पर्यंत रुट मार्च घेण्यात आला.