रीतेश तुळशिराम चौधरी
” महाराष्ट्र उद्योग रत्न ” या पुरस्काराने सन्मानित .
धर्मेंद्र सुत्रपवार
मूल:- ध्येय वेडानी झपाटलेल्या मुल च्या मातीतला अवघ्या 27 वर्षाच्या तरुणाला नुकत्याच नाशिक येथे पार पडलेल्या पुरस्कार सोहळ्यात “महाराष्ट्र उद्योग रत्न” या पुरस्काराने सन्मानित करण्यात आले. रितेश तुळशीराम चौधरी रा.मुल,जी. चंद्रपूर वय वर्षे 27 असे या तरूणाचे अल्पसे परिचय असले तरी त्याच्या कर्तुत्वामुळे तो उद्योगजकतात नाव कोरण्यात यशस्वी झाला आहे. आईचे छत्र हरपलेला रितेश मुल येथे आपल्या अपाहिज वडिलांसोबत राहत असे परंतु जीवनात काही तरी वेगळ कराण्याची त्याची जिद्द चिकाटी तळमळ त्याला स्वस्त बसू देत नव्हती, या प्रेरणेतून त्याने “झी मुल फिल्मयू म्युझिक स्टार ” या नावानी यूट्यूब चॅनल निर्मित केले तो एवढ्या वरती च थांबला नाही तर त्याने सोशल मीडिया इन्फ्ल्युएन्सर म्हणुन अगदी कमी वेळात, दिवस रात्र मेहनत घेत स्वतःची ओळख निर्माण केली . रितेश बद्दल आणखी सांगायचं म्हटल तर एक वर्षा पूर्वी रिलीज झालेल्या व विदर्भात गाजलेल्या कृपाल लंजे निर्मित आणि दिग्दर्शित हिंदी “बेबस” चित्रपटामध्ये रितेश नी सह निर्देशक म्हणुन तसेच एक अभिनेता म्हणून पण भुमिका बजावली होती आणि आता त्याची सोशियल मीडिया वरची उत्तुंग भरारी खरोखरच प्रेरणादायी आहे. रितेश च्या या यशाचे मुल नगरीत सार्वत्रिक कौतुक केले जात आहे.