शालेय सांस्कृतिक कार्यक्रम व सेवा निवृत्तीचा सत्कार सोहळा संपन्न–
जितेंद्र बोरकर सावली प्रतिनिधी ✒️✒️. शाळा सुधार समिती व जिल्हा परिषद प्राथमिक शाळा चारगाव तालुका सावली इथे १८ फेब्रुवारी ला शालेय सांस्कृतिक व सेवा निवृत्तीचा सत्कार सोहळा कार्यक्रम आयोजित करण्यात आले . या कार्यक्रमाचे अध्यक्ष म्हणून सौ. ज्योतीताई बहीरवार सरपंच, तसेच कार्यक्रमाचे उद्घाटक श्री मेश्राम साहेब वनपाल पेंठरी, सत्कार मुर्ती म्हणून श्री दुर्गे साहेब अभियंता, श्री मोरेश्वर बुरीवार से. नि. प्राचार्य सावली, श्री गणपतराव बुरीवार से. नि. मंडळ अधिकारी चंद्रपूर, यांचे सत्कार शाळा समिती व गावकरी यांच्या उपस्थितीत पार पडला तसेच कार्यक्रमात पाहुण्यांचे स्वागत जिल्हा परिषद प्राथमिक शाळा चारगाव विद्यार्थी व विद्यार्थिनी यांनी स्वागत गितानी केले, तसेच ह्या कार्यक्रमाचे संचालन साखरे सर यांनी केले,विद्यार्थी, विद्यार्थिनी व गावकरी बहुसंख्येने उपस्थित होते