शिवभक्तांच्या सेवेत बोरचांदली येथील युवा मित्र परिवारा चे वतीने महाशिवरात्री निमित्त संपूर्ण दिवस महाप्रसाद वाटप-

शिवभक्तांच्या सेवेत
बोरचांदली येथील युवा मित्र परिवारा चे वतीने महाशिवरात्री निमित्त संपूर्ण दिवस महाप्रसाद वाटप-

मुल-    धर्मेंद्र सुत्रपवार

आज दि.२६/०२/२०२५
मूल तालुक्यातील बोरचांदली येथील तरुण मित्र एकत्रित येऊन सामाजिक दायित्व जोपासत
मार्कंडा तिर्थस्थान ला जाणाऱ्या येणाऱ्या भाविकांसाठी महाप्रसाद शुभदान करण्याचा संकल्प करून आज संपूर्ण दिवसभर महाप्रसाद वाटप केले.ह्यासाठी
बोरचांदली येथील सर्व युवक मित्रांनी सहकार्य केले.सर्वांचे शिवभक्तांनी आभार मानले.
यशस्वीतेसाठी अनुप नरेड्डीवार,शुभम रत्नावार,मारोती कटकमवार, दिनेश येनूगवार,तुषार पुपरेड्डीवार,अमित येनगंटीवार ,अमर रामीडवार अंकित कुंटावार, अनिरूद्ध कुंटावार, पांडूरंग गोंगले व सर्व बोरचांदली येथील युवा मित्रांचे व सर्वां गावकऱ्यांनी तनमनधना ने केलेल्या सहकार्याबद्दल व युवकांचे सामाजिक योगदानाबद्दल श्री.योगेशभाऊ कटकमवार ह्यांनी धन्यवाद मानले.