रुग्णांच्या सेवेसाठी वाढदिवस… महिला पत्रकार कुमुदिनी भोयर यांच्या उपक्रमाचे कौतुक
मूल (प्रतिनिधी) – “सुख-दुःखाच्या वाटचालीत इतरांच्या वेदनांमध्ये स्वतःचे आनंद मिसळणं हीच खऱ्या अर्थाने माणुसकी आहे,” याचे उदाहरण मुल येथील महिला पत्रकार कुमुदिनी भोयर यांनी आपल्या वाढदिवसानिमित्त घालून दिले. त्यांनी उपजिल्हा रुग्णालय, मूल येथे दाखल रुग्णांना फळे व बिस्किटांचे वाटप करून आपला वाढदिवस समाजसेवेत अर्पण केला.
या उपक्रमात रुग्णांना मानसिक दिलासा मिळावा व त्यांच्या उपचारात पोषणात्मक हातभार लागू या उद्देशाने हा उपक्रम राबविण्यात आला. प्रसंगी रुग्णांच्या चेहऱ्यावर उमटलेले समाधान आणि आशीर्वादाचा ओलावा उपस्थितांच्या मनाला भावून गेला.
या सामाजिक उपक्रमाला अनेक मान्यवरांची साथ लाभली. ज्येष्ठ पत्रकार विजय प्रभाकर सिद्धावार, माजी नगर परिषद उपाध्यक्ष प्रवीण मोहुर्ले, माजी नगरसेवक प्रशांत समर्थ, निलेश रॉय, सामाजिक कार्यकर्ते विवेक मुतलवार, पत्रकार अमित राऊत, सतिश राजूरवार, धर्मेंद्र सूत्रपवार, नितेश मकलवार, संदीप मोहबे, आशुतोष सादमवार, बबलू सय्यद, राकेश मोहुर्ले, ‘जिजाऊ ब्रिगेड’च्या अध्यक्षा संजीवनी वाघरे, ‘स्त्रीशक्ती’च्या कल्पना मेश्राम आदींची यावेळी उपस्थिती होती.
या उपक्रमातून सामाजिक जबाबदारीचे भान जपणाऱ्या पत्रकारितेचा एक सकारात्मक चेहरा समोर आला असून, इतरांनाही प्रेरणा मिळावी असा संदेश यातून प्रसारित झाला आहे. कुमुदिनी भोयर यांच्या या अभिनव उपक्रमाचे सर्वत्र कौतुक होत आहे.




