कामगारांची उपासमार……… ?
‘थॅरमॅक्स’ चे कामगार दोन महिन्यापासून वेतनाच्या प़तिक्षेत?

तहसीलदारांना निवेदन सादर.

चंद्रपूर( मूल) :—-मूल एम. आय. डि. सी. क्षेत्रात थॅरमो अॅड गुप्ता कंपनीज अंतगॅत सुरू असलेल्या
इंडस्ट्रीज मध्ये कामगारांना
गत दोन महिन्यांपासून वेतन न देण्यात न आल्याने व आता या
कामगारांना कामावरून कमी करण्याचे धोरण कंपनीने सुरू
केल्याने या अनेक कामगारांवर आथिंक व मानसिक संकट कोसळल्याने या कामगारांनी भारतीय जनहित कार्यसेवा या
मजूर कल्याण संघटनेच्या नेतृत्वाखाली तहसीलदार मूल यांना
निवेदन सादर करून आपल्यावर
होत असलेल्या अन्यायाविरुद्ध दाद
मागितले आहे. दि. ६ जून २०२५ ला
या संघटनेचे प्रमुख दत्तू भाऊ समथॅ
यांचे नेतृत्वाखाली तहसील कार्यालय
मूल येथे निवेदन सादर केले.

सादर निवेदन अनुसार मूल एम. आय. डि. सी. मध्ये थॅरमॅक्स कानिऀवल इंडस्ट्रीज मध्ये गत जानेवारी २०२५ पासून अनेक कामगार विवीध पदावर कार्यरत आहेत. सदर
कंपनीने या कामगारांचे एप्रिल व मे
या दोन महिन्याचे वेतन दिले नाही
व या कामगारांना कामावर न येण्याकरिता गेट बंद करण्याचे धोरण स्वीकारले असल्याचे कळते.
या संबधाने कामगार विचारणा करण्यास गेले असता त्यांना व्यवस्थापनातफै उडवाउडवीची उत्तरे
देण्यात येत असल्याने मानसिक व आथिऀक त्रास सहन करावा लागत असून या कामगारांच्या कुटुंबियांची उपासमार होत असल्याचे या निवेदनात स्पष्ट करण्यात आले आहे.

प़शाशनाने या गंभीर बाबीकडे
लक्ष देऊन कामगारांचे आथिऀक व मानसिक शोषण थांबवावे अशी मागणी भारतीय जनहित कायऀसेवा
या संघटनेने निवेदनातून केली आहे.