आज गुणवंतांच्या पाठीवर शाबासकीची थाप.

आज गुणवंतांच्या पाठीवर शाबासकीची थाप.

चंद्रपूर/ नागभीड:–

इयत्ता १० वी व १२ वीचे निकाल लागलेत. जिल्हा स्तरावर, तालुका स्तरावर राजकीय मंडळी, शैक्षणिक संस्था, सामाजिक संघटनांनी
वाजागाजा करून गुणवंतांच्या सत्काराच्या कायॅक़म केलेत. यात
अनेकदा ग्रामीण भागातील सच्चे
गुणवंत डावलले जातात जे निखळ पणे विपरीत परिस्थितीत स्वकतुत्वाने गुणवंत ठरतात. त्यांना
योग्य मार्गदर्शनापासून कोसो दूर राहावे लागते. मात्र नागभीड तालुक्यातील नवेगाव पांडव, मिंथूर
येथील प़ाविण्यप़ाप्त विदयार्थी व
विदयार्थीनींना शिक्षणप्रेमी चव्हाण
परिवार कुठलाही वाजागाजा न करता छोटेखानी पण सुंदर कायॅक़म
घेऊन स्वखर्चाने उपकुत करतात व ही परंपरा गत १५ वषॉपासून सुरू आहे. यंदाही मागॅदशॅक व मान्यवरांच्या उपस्थितीत दि. १२ जुलै ला या ग्रामीण भागातील पन्नासावर खऱ्या गुणवंतांच्या पाठीवर शाबासकीची थाप पडणार आहे. गोड भेटवस्तू देऊन, मागॅदशॅन
देऊन चव्हाण परिवार ही परंपरा कायम ठेवण्यासाठी लालाचीत आहे.

मिंथूर येथील समाज मंदीरात या कायॅक़माचे आयोजन
करण्यात आले असून ग़ामिण परिसरातील गुणवंतांना चव्हाण बंधूंनी स्वता आमंत्रित केले आहे.
ईश्वर- रखुमाई चव्हाण यांच्या स्मरणार्थ
दरवर्षी गुणवंतांच्या पाठीवर थाप
देण्यासाठी निस्वार्थ भावनेने, स्वखर्चाने चंद्रपूर निवासी चव्हाण परिवार या महत कायॅक़माचे आयोजन करीत असतो.

संपन्न होणाऱ्या या समारंभाचे
अध्यक्षस्थानी डॉ. संदीप गेडाम,
अतिथी म्हणून ऍड. शामिंल रामटेक,
मिंथूर येथील सरपंचा विशाखा ताई डोंगरे राहतील तर प्रमुख मागॅदशॅक
म्हणून राज्य पत्रकार संघाचे राज्य
उपाध्यक्ष प़ा. महेश पानसे, ने. हि.
विद्यालयाचे मुख्याध्यापक विनोद
भैया, अरूण चव्हाण आहेत.

नवेगाव पांडव, मिंथूर या
ग़ामीण परिसरातील गुणवंत विदयार्थी दरवर्षी या मधूर कायॅक़माची उत्सुकतेने वाट बघतात
हे विशेष.