राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी मुल तर्फे स्व.महेंद्र कोडापे यांच्या कुटुंबीयांना ५० हजार रुपयांची आर्थिक मदत
*तालुका अध्यक्ष मंगेश पोटवार यांनी घेतला पुढाकार, माणुसकीचे जिवंत उदाहरण*
*मूल प्रतिनिधी*
राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष तथा महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री नाम.अजितदादा यांनी सांगितलेल्या सामाजिक मार्गानुसार राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष कार्यकर्त्यांच्या पाठीशी फक्त राजकीय दृष्टिकोनातूनच नाही, तर माणुसकीच्या नात्यानेही नेहमी उभा असतो, हे पुन्हा एकदा सिद्ध झालं आहे. अपघातात दुर्दैवी मृत्यू झालेल्या मूल येथील निष्ठावान कार्यकर्ते दिवंगत महेंद्र कोडापे आगडी यांच्या पत्नी श्रीमती नयनाताई महेंद्र कोडापे यांना राष्ट्रवादी काँग्रेस पक्षातर्फे ५०,००० रुपयांची रोख मदत प्रदान करण्यात आली.
या मदतीसाठी राष्ट्रवादी काँग्रेसचे तालुका अध्यक्ष मा.मंगेश भाऊ पोटवार यांनी स्वतः पुढाकार घेतला. दिवंगत कार्यकर्त्याच्या पत्नीला सन्मानपूर्वक मदतीची रक्कम सुपूर्त केली. त्यांच्या या संवेदनशील आणि आपुलकीने भरलेल्या कृतीमुळे उपस्थितांमध्ये भावनिक वातावरण निर्माण झाले. एका निष्ठावान कार्यकर्त्याच्या निधनानंतर पक्षाने दाखवलेली ही साथ म्हणजे एका कर्तव्यनिष्ठ कार्यकर्त्याच्या त्यागाला दिलेला नम्र सन्मान आहे.
दिवंगत महेंद्र कोडापे यांनी पक्षाच्या कार्यात नेहमी अग्रेसर राहून सहभाग घेतला होता. प्रत्येक आंदोलन,कार्यक्रम आणि सामाजिक उपक्रमात त्यांनी सक्रिय सहभाग घेतला होता.त्यांच्या निधनाने पक्षाला मोठा धक्का बसला आहे, पण त्यांच्या पश्चात कुटुंबियांच्या दुःखात सहभागी होऊन राष्ट्रवादी काँग्रेसने माणुसकीचा खरा अर्थ जपला आहे.
या प्रसंगी बोलताना मंगेश पोटवार म्हणाले, महेंद्र कोडापे हे फक्त कार्यकर्ता नव्हते, तर आमच्या पक्षाचे एक खंबीर शिलेदार होते. त्यांच्या जाण्याने निर्माण झालेली पोकळी भरून काढणे कठीण असले तरी त्यांच्या कुटुंबाला आपण कधीही एकटं पडू देणार नाही.
पक्षाच्या या मदतीने कोडापे कुटुंबाला नवा विश्वास मिळाला आहे. उपस्थित कार्यकर्त्यांमध्ये देखील पक्षाच्या या माणुसकीच्या भावनेने एक वेगळीच ऊर्जा आणि बांधिलकी निर्माण केली आहे. *“पक्ष हा कुटुंब आहे”*, हे राष्ट्रवादी काँग्रेसने पुन्हा एकदा कृतीतून दाखवून दिले. यावेळी
यावेळी राष्ट्रवादी काँग्रेसचे मुल शहराध्यक्ष आकाश येसनकर, दिव्यांग सेल जिल्हाध्यक्ष रोहित कामडे, महिला विधानसभा अध्यक्ष संगीताताई गेडाम,तालुका अध्यक्ष शीतलताई वाढगुरे,मूल महिला महिलांच्या मुल शहर अध्यक्ष धारा मेश्राम, ओबीसी आघाडीचे मुल तालुका अध्यक्ष वासुदेव पीपरे,माला शेंडे, सुवर्णाकक्षी रामटेके, रजत कुकडे, अल्पसंख्याक शहराध्यक्ष आशु खान, सोहेल भसारकर, शंकर पुरमशेट्टीवार,गौरव शामकुळे, राहुल भघमारे, आदित्य गेडाम, वासुदेव पिपरे रोहित शेंडे, यश गेडाम आदी पदाधिकारी कार्यकर्ते उपस्थित होते.




