मुल येथे ग्रामगीता अध्याय वाचन उपक्रम संपन्न –

मुल येथे ग्रामगीता अध्याय वाचन उपक्रम संपन्न –

मानवतेचे महान पुजारी वं.राष्ट्रसंत तुकडोजी महाराज साहित्य विचार व ग्रामगीता प्रबोधन व्हावे यादृष्टीने आर्त संदेशा प्रमाणे
“जे कोणी माझे स्नेही प्रेमळ!
त्यांनी करावा ग्रंथाचा सुकाळ! घरोघरी चालवावा प्रचार निर्मळ! ग्रामगीता वाचनाचा!!
हा उपक्रम मुल येथील श्रीगुरुदेव सेवा मंडळ शाखा आणि श्री गुरुदेव बचत गट मुलच्या वतीने श्रावण मासानिमित्ताने घर तेथे ग्रामगीता संदेश पोहचवण्यासाठी राष्ट्रसंत तुकडोजी महाराज साहित्य विचार समर्पित मंडळींकडे सामुदायिक प्रार्थना आणि ग्रामगीतेतील ४१ अध्याय वाचन उपक्रम आयोजित करण्यात आला
“*एक घर, एक उपासक,एक दिवस,एक अध्याय*” अशा वैशिष्ट्यपूर्ण उपक्रमाची सुरुवात श्रावण शुद्ध सप्तमी गोस्वामी तुलसीदास जयंती पासून प्रा. वसंतराव ताजने यांच्या निवासस्थानी ग्रामगीतेतील सद् धर्ममंथन पंचकातील प्रथम अध्याय देवदर्शन वाचन आणि अर्थ विवेचनांने झाली. भाद्रपद कृष्ण तृतीया सत्यदेव महाराज पुण्यतिथी पर्यंत ४१ दिवस अखंड चाललेल्या उपक्रमाचा समारोप दिनांक १४ सप्टेंबर २०२५ रोज रविवारला मांडवकर निवासस्थानी संपन्न झाला.याप्रसंगी १८नवीन जुळलेल्या श्री गुरुदेव सेवा मंडळ सभासदांना ग्रामगीता देऊन सन्मानित करण्यात आले.
ग्रामगीता अध्याय वाचन व अर्थ विवेचन राष्ट्रसंत तुकडोजी महाराज विचारांशी समर्पित अधिकाधिक उपासक मंडळींकडे व्हावा ,या हेतूने ग्रामगीताचार्य गणेश मांडवकर, मध्यवर्ती प्रतिनिधी शरदराव सहारे,प्रा.वसंतराव ताजने,प्रा.किसनराव वासाडे, विजयराव लाडेकर,नामदेव पिजदुरकर,सितकुराजी देशमुख, सुखदेव चौथाले,धनंजय गोहणे, गुरुदेव बोदलकर, चंद्रशेखर पिदुरकर, विलासराव मांडवकर, रमेशभाऊ तांगडे,निलेश माथनकर, माणिकराव पाटेवार , रमेशजी झाडे ,सौ.सुलोचना तांगडे,मंगला ताजने, उषाताई वासाडे, उर्मिला गोहणे, शशिकला मांडवकर, सविता पिजदुरकर,प्रभा चौथाले, कल्पना पिदुरकर, सुनंदा लाडेकर, दिपाली मांडवकर, माधुरी बोदलकर,जयश्री माथनकर,प्रितिशा पाटेवार,सरीता झाडे, देशमुखताई यांच्या सहकार्याने संपन्न झाला.
समारोपीय कार्यक्रम ग्रामगीताचार्य शरदभाऊ सहारे मध्यवर्ती प्रतिनिधी यांच्या उपस्थितीत झाला.कार्यक्रमाचे प्रास्ताविक ग्रामगीताचार्य नामदेव पिजदुरकर, अहवाल वाचन सुखदेव चौथाले, सुत्रसंचालन गणेश मांडवकर तर आभारप्रदर्शन किसनराव वासाडे यांनी केले. राष्ट्रवंदना गायनाने कार्यक्रम संपन्न झाला.