खादी ग्रामोद्योग मुल येथे महात्मा गांधी जयंती निमित्त सवलत मेळाव्याची सुरवात
मुल – प्रतिनिधी
स्वदेशी मेळाव्याला जनतेचा उत्स्फूर्त प्रतिसाद
नाग विदर्भ चरखा संघ मुल च्या वतीने दरवर्षी प्रमाणे महात्मा गांधी यांच्या जयंतीनिमित्त सवलत मेळाव्याला सुरुवात झाली आहे, सदर मेळाव्याचे उदघाटन चंद्रपूर जिल्हा सहकारी बोर्डाचे अध्यक्ष तथा कर्मवीर महाविद्यालयाचे माजी प्राचार्य ते क कापगते यांच्या हस्ते करण्यात आले, नप मुल चे माजी उपाध्यक्ष नंदकिशोर रणदिवे, भारतीय जनता पक्ष मुल चे शहर अध्यक्ष प्रवीण मोहूर्ले, माजी बांधकाम सभापती प्रशांत समर्थ, नागविदर्भ चरखा संघ मुल चे अध्यक्ष बंडूजी भडके, सचिव दादाजी बनकर, केंद्र व्यवस्थापक गुरुदास बोरकर, सामाजिक कार्यकर्ते किशोर कापगते, चित्तरंजन वाढई, देवाजी पाल तथा नागरिक व कर्मचारी उपस्थित होते, 2 ऑक्टोबर पासून खादी विक्रीवर सूट राहणार असून ही सूट पुढील 45 दिवस लागू राहणार आहे, यावर्षी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी स्वदेशी वापरण्याचे आवाहन केले असल्यामुळे खादी विक्रीला प्रचंड प्रतिसाद लाभत आहे, सर्व जनतेने ग्रामोद्योग ला चालना देण्यासाठी सदर सवलतीचा लाभ घेण्याचे आवाहन मुल खादी भंडार च्या वतीने करण्यात आले आहे




