विश्वशांती विद्यालय मारोडा येथे संपन्न झाली आरोग्य तपासणी.मूल उपजिल्हा रुग्णालयाच्या चमूने केली तब्बल 416 विद्यार्थ्याची तपासणी –
मूल प्रतिनिधी
तालुक्यातील विश्वशांती विद्यालय मारोडा येथे मूल येथील उपजिल्हा रुग्णालयाच्या चमूने आज दिनांक 1 डिसें. 2025 रोज सोमवार ला तब्बल 416 विद्यार्थी , विद्यार्थिनी ची तपासणी करण्यात आली. सध्या वातावरण सतत बदलत आहॆ आणि आता गेल्या दोन दिवसांपासून अचानक थंडी सुरू झाली आहॆ त्यामुळे ग्रामीण भागांतील विद्यार्थ्याना अनेक छोटे आजार होतं असतात त्यामुळे आरोग्य प्रशासना सतर्क रहात असतो त्यामुळे मूल तालुक्यातील अनेक शाळांमध्ये या चमू कडून तपासणी सुरू आहॆ , आणि आज विश्वशांती विद्यालयात ही चमू आली आहॆ , या चमू तर्फे विद्यार्थ्यांची सर्दी खोकला , ताप तसेच इतर संसर्ग जन्य रोगाची तपासणी करण्यात आली तसेच विद्यार्थ्यांना आरोग्यविषयक व शारीरिक स्वच्छतेचे मार्गदर्शन सुध्दा देण्यात आले , या आरोग्य तपासणी च्या कार्यक्रमात विश्वशांती विद्यालय मारोडाचे मुख्याध्यापक तथा प्राचार्य धनंजय गाडेवार सर उपस्थित होते तर उपजिल्हा रुग्णालयाचे डॉ. अनिता मेश्राम , दीपमाला बाला फार्मासिस्ट ,आशा निखाडे anm तसेच शाळेतील शिक्षक, शिक्षिका प्राध्यापक वृंद उपस्थित होते




