नवभारत विद्यालयात शिवाजी महाराज जयंती संपन्न.
मुल – प्रतिनिधी
मूल:—— नवभारत विद्यालय तथा
कनिष्ट विज्ञान महाविद्यालयात महाराष्ट्राचे आराध्य छत्रपती शिवाजी महाराज यांची जयंती उत्साहात साजरी करण्यात आली.
मुख्याध्यापक तथा प्राचार्य
छत्रपती बारसाकडे यांनी द्विप प्रज्वलन करून शिवाजी महाराजांच्या प्रतिमेला पुष्पमाला वाहिली. प्रा. महेश पानसे, जेष्ट शिक्षक गुरुदास चौधरी, प्रा. किसन
वासाडे, प्रा. संजय येरोजवार, यांचेसह उपस्थित सर्व शिक्षक, प़ाध्यापक यांनी पुष्प वाहून नमन
केले.
छत्रपती शिवराय एक आदर्श
व शिलवान राजे होते. महाराजांनी
बांधलेले व राखलेले 351 गडकिल्ले
आजही त्यांच्या पराक्रमाची साक्ष देत उभे असल्याचे व सर्व धर्मातून
उभी केलेली त्यांची मावळ्यांची फौज आदर्श असल्याचे मत उपस्थितांनी यावेळी व्यक्त केले.
या उत्साहपूर्ण कायॅक़मात
प्रा. पुस्तोडे, प्रा. धोटे, प्रा. कु. उगेमुगे, प्रा. येलमूले विद्यालयातील शिक्षक सर्वश्री मोडक, मानकरी, चौधरी, निखारे, गोडे, सलाम, शिक्षिका कु. उमक कु. गोंगल कु. तलांडे तसेच शिक्षकेतर कर्मचारी
उपस्थित होते.




