नवभारत विद्यालयाचा उपक्रम….

नवभारत विद्यालयाचा उपक्रम….

विद्यार्थ्यांनी तयार केली सीड बॅक

मूल:— प्रतिनिधी

पर्यावरण संरक्षण ही काळाची गरज हे लक्षात घेऊन नवभारतसीड बॅंक तयार करून स्तुत्य उपक्रम राबविला.
दि.06/04/2026 ला नवभारत विद्यालयाचे मुख्याध्यापक श्री सी.जी.बारसागडे यांच्या मार्गदर्शनाखाली नागपूर विभाग पर्यावरण सेवा तसेच राष्ट्रीय हरित सेना व स्काऊट व गाईड यांच्या संयुक्त विद्यमाने पर्यावरण
सखी सौ.व्ही एस.भांडारकर यांच्या सहकार्याने विद्यार्थ्यांनी सीड बॅक तयार केली.
विद्यार्थांनी अनेक फळांच्या व फुलांच्या बीया जमा केल्या व त्या बीया सीड बॅक मध्ये गोळा करण्यात आल्या. पर्यावरण संवर्धन ही काळाची गरज लक्षात घेता अतिशय आनंदाने विद्यार्थांनी हा उपक्रम राबविला.
जमा करण्यात आलेल्या
विवीध फळांच्या सीड मागणीनुसार
पुरविण्यात येतात किंवा रोपटे तयार करून त्यांचे अनेक कार्यक्रमात किंवा अनेकांना वाढदिवसानिमित्त त्यांचे वाटप करण्यात येते.
या स्तुत्य उपक्रमाबद्दल नवभारत विद्यालयातील विदयार्थी
यांचे अभिनंदन करण्यात आले.