नेहालिका ठिकरे हिचे सुयश, भारतीय जनता पक्षातर्फे सत्कार

नेहालिका ठिकरे हिचे सुयश, भारतीय जनता पक्षातर्फे सत्कार

शिकवणी नसतांना ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांनीचे सुयश

मुल – प्रतिनिधी

राजोली येथील भाजपचे जेष्ठ नेते सुरेश पाटील ठिकरे यांची नात कु नेहालिका गोपाल ठिकरे हिने दहावीच्या सी बी एस ई परीक्षेत मिळवलेल्या दैदीप्यमान यशाबद्दल भारतीय जनता पक्षाच्या वतीने राजोली येथे त्यांच्या निवासस्थानी जाऊन सत्कार करण्यात आला , नेहालिका ही सिंदेवाही येथील देवयानी इंटरनॅशनल स्कूल सिंदेवाही ची विद्यार्थीनि असून तिला 94.60% टक्के गुण मिळाले ,मुल भाजप शहर अध्यक्ष प्रवीण मोहूर्ले, दशरथ पाटील बोरकर राजोली,माजी नप सभापती मिलिंद खोब्रागडे, किशोर कापगते, गजानन वलकेवार, चंदू भाऊ नामपल्लीवार, भाजयुमो तालुका अध्यक्ष श्रीधर पाखमोडे, महासचिव जितू टिंगुसले, रोहित रायपुरे, हितेश ठिकरे, विवेक ठिकरे, सचिन गेडाम, प्रवीण मोहूर्ले चिमढा, आणि कार्यकर्ते उपस्थित होते, ग्रामीण भागातील शेतकरी कुटुंबातील विद्यार्थ्यांनि राजोली येथून सिंदेवाही ला ये जा करीत असताना सुद्धा, कोणतीही शिकवणी न लावता मिळालेल्या यशाबद्दल कु नेहालिका हिचे सर्वत्र कौतुक होत आहे.