डॉ.बि.आर.आंबेडकर विद्यालयातील एक विद्यार्थीनी शिष्यवृत्तीस पात्र

तालुका प्रतिनिधी न्यूज जागर 

मुख्याध्यापक जितेंद्र मेश्राम यांनी पुष्पगुच्छ देऊन केले अभिनंदन..
चामोर्शी तालुक्यातील डॉ. बि.आर. आंबेडकर विद्यालय वायगाव मधील एक विद्यार्थीनी (एन एम एम एस) आर्थिकदृष्ट्या मागास गुणवंत विद्यार्थीनी शिष्यवृत्ती परीक्षेत उत्तीर्ण झाली असल्यामुळे तिला वार्षिक 12000 हजार रुपये शिष्यवृत्ती मिळणार आहे.आर्थिकदृष्ट्या मागास विद्यार्थ्यांना शिक्षणासाठी मदत व्हावी म्हणून विद्यार्थ्यांना शासनाकडून 12 हजार रुपये शिष्यवृत्ती देण्यात येते. या विद्यार्थ्यांमध्ये कुमारी सिमरन उमेद्रं तावाडे ह्या विद्यार्थीनींनी यश संपादन करून शिष्यवृत्तीस पात्र ठरलेली आहे.सदर विद्यार्थिनींचा विद्यालयाचे मुख्याध्यापक जितेंद्र मेश्राम यांच्याहस्ते पुष्पगुच्छ देऊन सत्कार करण्यात आला.व पुढील शैक्षणिक वाटचालीस शुभेच्छा देण्यात आल्या. या प्रसंगी मुख्याध्यापक जितेंद्र मेश्राम, शिक्षक संजय वाढई,एस.जी.गजभिये, एस.एम.कोचे, के.एल.बन्सोड,डि.एच.वालदे, एस.बि.आल्लेवार, लिपिक पि.के.उंदिरवाडे, शिपाई आर.एस.वाटे,यादव पुच्छलवार, आदी शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी वृंद उपस्थित होते.