तालुका प्रतिनिधी न्युज जागर
चामोर्शी स्थानिक शिवाजी हायस्कूल मधील तीन विद्यार्थी (एन एम एम एस) आर्थिकदृष्ट्या मागास गुणवंत विद्यार्थी शिष्यवृत्ती परीक्षेत उत्तीर्ण झालेत। त्यांना वार्षिक 12000 हजार रुपये शिष्यवृत्ती मिळणार आहे।
आर्थिकदृष्ट्या मागास विद्यार्थ्यांना शिक्षणासाठी मदत व्हावी म्हणून विद्यार्थ्यांना शषणाकडून 12 हजार रुपये शिष्यवृत्ती देण्यात येते। या विद्यार्थ्यांमध्ये कुमारी धनश्री कुनघाडकर, हर्षल बूरांडे, कुमारी पौर्णिमा बारसागडे हे विद्यार्थी यश संपादन करून शिष्यवृत्तीस पात्र ठरले आहेत। सदर विद्यार्थ्यांचा विद्यालयाचे प्राचार्य रा.ना.ताजने यांच्याहस्ते पुष्पगुच्छ देऊन सत्कार करण्यात आला. व शैक्षणिक वाटचालीस शुभेच्छा दिल्या या कार्यक्रमाला उपप्राचार्य आर. एस. ताराम, पर्यवेक्षिका श्रीमती सेलूकर, व शाळेतील शिक्षक व शिक्षकेत्तर कर्मचारी आणि विद्यार्थी उपस्तीत होते कार्यक्रमांचे संचालन क्रीडा शिक्षक राकेश खेवले यांनी केले