रत्नापुरात पूणे चा भिडेवाडा प्रती कृती पहाणे व देविच्या दर्शनासाठी भक्तजनाची गर्दी उसळली

श्री.अरुण बारसागडे,चंद्रपूर जिल्हा प्रतिनिधी,न्यूज जागर

रोज दहा हजाराचे वर भक्त जन ची हजेरी
श्री गुरुदेव नवयुवक दुर्गा उत्सव मंडळ रत्ना पूर चा उपक्रम
रत्नापूर दि १ सिंदेवाही तालुक्यातील रत्नापूर येथे कार्यरत असणारे ( अठरा वर्षा पासुन ) श्री गुरुदेव नवयुवक दुर्गा उत्सव मंडळ आहे सदर मंडळाचे वतीने नवरात्र उत्सवात दुर्गा मातेची स्थापना करून दरवर्षाला देखावा चे प्रतीकृती तयार करुण भाविक भक्त गण याना दर्शनासाठी ठेवतात सोबतच मंडळाचे वतीने सामाजिक जन सामान्य माणसाला उपयोगी येणारे कार्यक्रम उपक्रम मंडळचे वतीने संपूर्ण नव दीवस राबविले जातात या देखाव्या चे दर्शना साठी व या होणाऱ्या कार्यक्रम उपक्रमाच लाभ घेण्यासाठी जिल्ह्याती . लच नव्हे तर जिल्ह्या बाहेरील जनता सुद्धा मोठ्या प्रमाणात रत्नापूर येत असते आणी या चालु वर्षात दुर्गा मातेची स्थापना झाल्या पासुन रत्नापुरात लोकांचं दोन चाकी चारचाकी गाडीने लोकांचे जथ्ये च्या जथ्ये रत्नापूरात दाखल होत आहेत सध्या स्थीती त त्यांचे रोज दहा हजाराचे वर जनता दाखल होत असल्याचे चित्र असुन मंडळाचे वतीने कोणत्याही अनुचीत प्रकार घडु नये म्हणून संपूर्ण सदस्य योग्य प्रकारे कार्य करीत आहेत आणी येणाऱ्या भाविक भक्त गणाची गैरसोय होवू नये त्यांना येथे दाखल झाल्यावर संपूर्ण गोष्टीचा लाभ व आस्वाद घेता येवून जाता यावे यासाठी सर्व सोयी करुण ठेवण्यात आल्या असुन सर्व मंडळाचे पदाधिकारी व सदस्य कार्य चोखपणे बजावत आहेत
मंडळातर्फ या चालु वर्षाला सामाजीक क्रांतीचे अग्रदुत क्रांती सुर्य महात्मा ज्योतीराव फुले व त्यांचे खाद्याला खांदा लावून सामज क्रांतीच्या अग्रदुत क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले या दापंत्यांचा सामाजीक क्रांतीचा संपूर्ण जीवन पट समाजा तील सर्व जाती जनतेला माहीती झाला पाहिजे त्यांचे कार्य कसे होते याची सर्वांना जानीव होवून हा इतिहास समाजातील प्रत्येक मनुष्याला प्राप्त झाले पाहीजे हा दुष्टी कोण मंडळाने बाग ळुन ही फुले दांपत्याच्या भिडे वाडा येथील प्रतीकृती रत्नापूर येथे सादर केली आहे त्यात त्यांनी त्यांचे संपूर्ण कार्याचे जीवनपट रेखाटले आहे. हे बघण्यासाठी व दुर्गा मातेच्या दर्शनासाठी भाविक भक्त गन मोठ्या प्रमाणात येत आहेत त्यामुळे सध्या रत्नापूरात जत्रेचे स्वरूप प्राप्त झाले असुन या नवरात्र चालणार्‍या न व दीवसाचे उत्सवात जवळपास पन्नास हजाराचे वर भाविक भक्त गण दर्शन घेण्याची शक्यता आहे आणी हया आज गर्दी चे स्थीती वरून नक्कीच घेतील
या सुंदर रमनि य व समाज प्रबोधन पर देखावा व दुर्गा मातेच्या दर्शना सोबत येणारे भावीक यांना मेला मिनाबाजार व सर्व प्रकारचे साही त्य असणारे दुकानाचा सुद्धा आस्वाद व लाभ घेता येत आहे आणी येणारी जनता ही या येथे मिळणारे सर्व गोष्टी चा आस्वाद घेवून वापस जात आहे आणी मंडळ सतत अविरत 18 वर्षा पासुन हे सर्व करताना राबवित आहे पंरतु अजुन पर्यंत कोणतही अनुर्चीत प्रकार घडलेला नाही आणी घडणार नाही याची पूरेपूर जबाबदारी स्वीकारून सर्व व्यवस्था चोखपणं बजावीत आहेत आणी या सर्व बाबीकडे मंडळ अध्यक्ष तथा माजी जी प सदस्य रमाकांत लोधे उपाध्यक्ष संजय गहाणे सचीव वामन जीवतोडे सदस्य नरेंद्र गहाणे मंगेश मेश्राम मंगेश गभणे इमारन पठान जगदीश गहाणे यांच सह सर्व सदस्य लक्ष देवून सतत प्रयत्न करत आहेत