गडचिरोली जिल्हा प्रतिनिधी ,न्यूज जागर
दोन वर्षे अल्पवयीन मुलीवर अतिप्रसंग करून तीन महिन्यापासून फरार असलेल्या आरोपी सुंदर साई घिस्सो मळावी वय 25 वर्षे राहणार करपणफुंडी तालुका एटापल्ली जिल्हा गडचिरोली यांच्या मुस्क्या आवडण्यात अखेर गडचिरोली पोलीस दलास यश आले आहे. आरोपी सुंदर साई घीसो मळावी याने दोन वर्षे चिमुकलीवर अतिप्रसंग केला. याबाबत त्या विरोधात पोलीस स्टेशन अप क्रमांक 040 / 2022 कलम 376 (2) जे ३७६ एबी भादवी सह कलम 4,6 पोस्को ऍक्ट अंतर्गत गुन्हा दाखल होता. तेव्हापासून तीन महिने तो फरार झाला होता. तो नक्षलदृष्ट्या अतिसंवेदनशील भाग असलेल्या येलचील, बुर्गी, ताडगाव, अशा वेगवेगळ्या जंगल परिसरामध्ये लपून बसला असल्यामुळे व हा परिसर नक्षल दृष्ट्या अति प्रभावी असल्यामुळे त्याचा शोध घेण्यास पोलिसांना प्रत्येक अडचणीचा सामना करावा लागला होता. अखेर तीन नोव्हेंबर रोजी पोलिसांनी गोपनीय यंत्रणा सक्रिय करून व गुप्त माहितीच्या आधारे अभियान राबवून आरोपी सुंदरसाई मळावी यास करपनफूंडी गावात पकडून अटक करून जिल्हा सत्र विशेष न्यायालय गडचिरोली येथे पोलीस कस्टडी रिमांड घेण्याकरिता हजर करण्यात आले. सदरची कारवाई जिल्हा पोलीस अधीक्षक निलोत्पल सा. अप्पर पोलीस अधीक्षक (अभियान) अनुज तारे सा. यांच्या मार्गदर्शनाखाली उपविभागीय पोलीस अधिकारी हेडरी बाबुराव दडस यांच्या नेतृत्वाखाली पोलीस उपनिरीक्षक श्रीकृष्ण शिंदे पोलीस मदत केंद्रबुर्गी, पोलीस उपनिरीक्षक संदीप व्हसकोटी व पोमके बुर्गी येथील पोलीस अंमलदार यांच्या टीमने केली असून पुढील तपास पोलीस करीत आहेत.



