श्री.अरुण बारसागडे ,चंद्रपूर जिल्हा प्रतिनिधी,न्यूज जागर
सावरगाव,दि.०१/०६/२०२३
तळोधी पोलीस स्टेशन अंतर्गत येणाऱ्या सावरगाव एचपी पेट्रोल पंप जवळ आज पहाटे ५.३० च्या दरम्यान झालेल्या कार अपघातात ४ जखमी तर १गंभीर जखमी झाले. तुमसर येथील राहिवाशी सौरभ रमेश बोगुलवार याचे लग्न मूल येते होते.लग्नाच्या कपड्यांमध्ये नवरदेवाचा ड्रेस नसल्याने व त्यांचा आजच लग्न असल्याने नवरदेव चा ड्रेस आणण्याकरिता नागपूरला गेले होते रात्री नागपूरवरून होंडा कंपनीची, MH-34 BV-3131 या कारणे मूल कडे परत येत असताना सावरगाव येथील एचपी पेट्रोल पंप जवळ ड्रायव्हरला झोपेची डूलकी आल्याने गाडीवरील नियंत्रण सुटून गाडी पुलाच्या कटड्याला आधळल्याणे अपघात झाला. या अपघातात ड्रायव्हर पवन सुनील बोपणवार (२८) बल्लारपूर यांचे दोन्ही पाय फ्रॅक्चर झाले तर गाडीत बसलेले नितीन प्रदीप गॊलीवार (२५) तुमसर यांच्या उजव्या हाताला गंभीर दुखापत झाली. सुमित रमेश गोगुलवार (३३) किरकोळ जखमी तर कुणाल सुमित बोपनवार (३३) बल्लारपूर त्यांच्या डोक्याला गंभीर दुखापत झाली आहे. सौरभ बोगुलवार व पवन बोपणवार मावस भाऊ आहेत,.घटनेची माहिती मिळताच पोलीस घटनास्थळ गाठून जखमींना नागभीड येथील रुग्णालयात हलविण्यात आले. चौघांचीही प्रकृती गंभीर असल्याने ब्रम्हपुरी येथील खाजगी रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे घटनेचा स्थळ पंचनामा करून पुढील तपास तळोधी बालापुरचे सहाय्यक सब इन्स्पेक्टर सुधाकर भानारकर पोलीस हवालदार विनोद चौधरी करीत आहेत.




