श्री.अरुण बारसागडे न्यूज जागर जिल्हा प्रतिनिधी चंद्रपूर
कवठी गावातील एक आशा वर्कर ची जागा रिक्त असल्यामुळे शासनाच्या जी.आर. नुसार ती जागा जनतेच्या माध्यमातून ग्राम सभेमध्ये निवडायची होती परंतु ग्राम पंचायत कमिटीने कोविड 19 चा काळ असल्यामुळे ग्राम पंचायत कार्यालय मध्ये ज्या पाच महिलांचे अर्ज सादर झाले होते त्यांना जीबगाव आरोग्य केंद्राचे डॉ.गोबाडे यांच्या उपस्थित नियुक्ती करण्याचे ठरवले आणि सुवर्णा बाळू कोटगले यांची नियुक्ती केली.
ही बाब जनतेच्या लक्षात येताच गावात उलटसुलट चर्चा गावात रंगली असता आशा वर्कर ची नियुक्ती थेट ग्राम सभेमध्ये घेण्याचे सरपंच यांनी ठरविले , ग्राम सभा ही २४/५/२०२२ ला घेण्याचे नोटीस काढले परंतु काही कारणास्थव सभा रद्द करण्यात आली त्या नंतर तीच ग्राम सभा २५/५/२०२२ला सरपंच च्या अध्यक्षते खाली घेण्यात आली आणि ग्राम सभे मध्ये आशा वर्कर म्हणून प्रेमीला प्रदीप भोयर यांच्या नावावर शिक्का मोर्तब झाले
परंतु सुवर्णा बाळू कोटगले आणि बेंडू बोरकुटे यांनी ही ग्राम सभा नियम बाह्य आहे म्हणून बीडीओ सावली यांना पत्र देऊन चौकशी करण्याची मागणी केली असता झालेली ग्राम सभा चुकीची आहे असे निष्पन्न झाले आणि दुसरी ग्राम सभा घेण्याचे आदेश दिले,ग्रामपंचाय कार्यालय कवठी ने ३०/८/२०२२ला ग्राम सभा घेण्याचे नोटीस काढले परंतु लोकांच्या अनुपस्थिती मूळे ती ग्राम सभा तहकूब झाली.
शेवटी तहकूब झालेली ग्राम सभा दिनांक ७/९/२०२२रोज बुधवार ला ग्रामपंचायत च्या प्रांगणात घेण्यात आले, ग्राम सभेमध्ये अनेक विषयांवर चर्चा करण्यात आले आणि आशा वर्कर ची नियुक्तीच्या विषयावर लोकांनी ग्राम पंचायत कमेटी ला काही प्रश्न उपस्थित केले असता, पदाधिकारी निरुत्तर झाले, शेवटी ग्राम सभेमध्ये आशा वर्कर नियुक्ती प्रलंबित राहिली.
जनप्रतिनिधी गावाच्या हितासाठी, गाव विकासाठी,आणि विचारण्यात आलेल्या प्रश्नाचे उत्तर देण्यासाठी टाळने,पदाचा गैर वापर करणे,ग्रामपंचायत च्या दस्तेवाज मध्ये अफरातफर करणे, अश्या अनेक कारणाने जनतेनी ग्राम सभेत सर्व सदस्य यांना अपात्र घोषित करण्याचा आज च्या ग्रामसभे मध्ये सर्वानुमते ठराव मंजूर करण्यात आला.
तसेच गावात बोगस डॉक्टर सुद्धा व्यवसाय करून गोर गरीब जनतेची दिशाभूल करीत आहेत कित्येक जणांना बोगस इंजेक्शन, गोळ्या देऊन जनतेच्या जिवासोबत खेळत आहे ही बाब जनतेच्या लक्षात येतात च ग्राम सभेमध्ये जनतेनी गावातील बोगस डॉक्टरांवर कार्यवाही करण्याचा ठराव घेण्यात आला आहे