श्री.अरुण बारसागडे, चंद्रपूर जिल्हा प्रतिनिधी , न्यूज जागर
नागभीड (तालुका प्रती) यावर्षी खराब वातावरणा मुळे शेतकऱ्यांच्या धानपिकावर पिसोरा रोगाचा प्रादुर्भाव दिसुन येत असल्याने पिकाचे उत्पन्न अर्ध्यावर येण्याची भिती शेतकरी वर्गा मध्ये व्यक्त करण्यात येत आहे.नागभीड तालुक्यात मोठ्या प्रमाणात धानपिक घेतले जाते.त्याची मशागत करण्यासाठी शेतकरी साधारणतःहा जुन महिण्या पासुनच शेताच्या कामाला लागत असुन थेट आक्टो-नव्हेंबर मध्ये धान कापनी पर्यत कामात व्यस्त असतो.दिवसेन-दिवस महागाईने चांगलाच उच्छांक मांडला आहे.शेती संबधीत वस्तूचे भाव गगनाला भिडले आहे.त्यामुळे शेती मध्ये धान पिकाचे उत्पन्न घेणे नुकसान दायक झाले आहे.काहींची वडलोपार्जीत शेती असल्यामुळे कसे तरी सोसायट्या मधुन कर्ज काढुन धान पिक घेतल्या जात आहे.खराब वातावरणा मुळे व वेगवेगळ्या रोंगाच्या प्रादुर्भावाने दिवसे-दिवस उत्प्न्नात घट येत आहे.शेतीला लागलेला अर्धाही खर्च निघत नसल्याने शेतकरी कर्जाच्या ओझ्या खाली दबत जात आहे.त्यामुळे त्यांच्या मनात नैराश्याची भावना निर्माण होत असुन,शेतकरी आत्महत्यांचे प्रमाण वाढत आहे.दरवर्षी धानाला तेच भाव कायम असल्याने शेतकरी दोन पैसाची गाठ बांधु शकत नसल्याने कुटुंबाचा राहाटगाळगा चालवायचा कसा हा प्रश्न निर्माण होत आहे.
यावर्षी धानपिकावर तुरतुळा व पिसोरा या रोगाचा मोठ्या प्रमाणात प्रादुर्भाव दिसुन येत आहे.त्या रोगाचा नायनाट करण्यासाठी तिनदा शेतात फवारणी केली,तरी सुद्धा हा रोग आटोक्यात आला नसल्याचे शेतकऱ्यांचे म्हणणे आहे.त्याचबरोबर आता मध्य प्रकारचे धान कापण्या जोगे झाले आहेत पण पाऊसाचे वातावरण असल्यामुळे शेतकरी थांबुन आहे.दिवाळी हा सण अवघ्या काही दिवसावर येऊन ठेपला आहे,वातावरण चांगले असते तर धान कापुन,चुराई करुन त्याची विक्री केली असती व त्यांच्या हाथात दोन पैसे मिळाले असते.यावर्षी धानपिकात मोठ्या प्रमाणात घट येण्याची भिती व्यक्त करीत आहेत.शासनाने आताच या पिकांचा सर्वे करुन शेतकऱ्यांना नुकसान भरपाई देण्यात यावी अशी मागणी जोर धरु लागली आहे,