श्री.अरुण बारसागडे, चंद्रपूर जिल्हा प्रतिनिधी , न्यूज जागर
शासनाने 20 च्या आतील पटसंख्या असलेल्या जिल्हा परिषद शाळा बंद करण्याचा निर्णय घेतला आहे त्या निर्णयाविरोधात तहसील कार्यालय नागभीड येथे 17 ऑक्टोंबर सोमवार ला सर्व सरपंच, ग्रामपंचायत सदस्य, शाळाव्यावस्थापन समिती अध्यक्ष सदस्य मुख्याध्यापक, व पालक वर्ग यांचा महाआक्रोश मोर्चा करण्यात आलेला आहे.
नागभीड तालुक्यातील बहुतेक भाग हा जंगलव्याप्त असून छोटी छोटी खेडी मोठ्या प्रमाणात असून ही खेडी पूर्णपणे जंगलव्याप्त आहेत, अशा परिस्थितीत येथील नागरिक ही मजुरी करून घरसंसार चालवीत असून आपल्या मुलाचे शिक्षण पूर्ण करीत असतात, अश्या परिस्थितीत शासनाने 20 च्या आत पटसंख्या असलेल्या शाळा बंद करण्याचा निर्णय घेतला असून त्याचा संपूर्ण नुकसान हा ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांना होतो. पहिलेच गरिबीने खचलेला नागरिक हा मुलांच्या शिक्षणासाठी लहान विद्यार्थ्यांना शहरात पाठवू शकत नाही आणि वसतिगृहात जरी ठेवला तरी त्याला स्वतःची नीट काळजी घेता येत नाही अश्या परिस्थितीत विद्यार्थ्यांना एकटे बाहेर ठेवू पण शकत नाही आणि संपूर्ण खेडी हे जंगलव्याप्त असून जंगली श्वापदांचा वावर मोठ्या प्रमाणात असल्याने त्यांना समोरील गावात शिक्षणासाठी एकटे पाठवणे पण अशक्य आहे, अश्या विविध अडचणी समोर येत आहे, ह्यामुळे ज्या शाळा ची पटसंख्या कमी आहे अशा शाळा पूर्ववत सुरू ठेवाव्यात यासाठी नागभीड तालुक्यातील सरपंच ,सदस्य, शाळाव्यावस्थापन समिती अध्यक्ष सदस्य मुख्याध्यापक व गावातील नागरिक यांनी मोठ्या प्रमाणात या मोर्चात सहभागी व्हावे. आपल्या गावातील जिल्हा परिषद शाळा वाचवाव्यात असा मोठा आव्हान श्री हेमराज लांजेवार, जिल्हाध्यक्ष सरपंच सेवा महासंघ चंद्रपूर यांनी केलेला आहे