जि.प. शाळा वाचवण्यासाठी नागभीडात आक्रोश मोर्चा. तहसिलदारांना दिले निवेदन.

श्री.अरुण बारसागडे, चंद्रपूर जिल्हा प्रतिनिधी , न्यूज जागर

ग्रामीण भागातील जिल्हा परिषद च्या शाळा राज्य शासनाने बंद करु नये या मागणी साठी नागभीड तालुक्यातील सरपंचाच्या व गावातील नागरीकांच्या वतीने सोमवारला तहसिल कार्यालयावर आक्रोश मोर्चा काढण्यात आला.मोर्चाचे रुपांत्तर सभेत होऊन शासना विषयी नारे बाजी करण्यात आली.त्यानंतर तहसिलदारांना निवेदन सादर करण्यात आले.त्या निवेदनात म्हटले आहे.कि सरकारने २० पेक्षा कमी पटसंख्या असलेल्या शाळा बंद करण्याचा व या माध्यमातून शिक्षणाचे बाजारीकरण व खाजगीकरण करण्याचा डाव आखलेला आहे.या शाळांमध्ये एस.सी. एस.टी.ओ बी.सी.प्रवर्गातील,वंचित घटकातील,दारिद्रय रेषेखालील बहुजनांची मुले मोठ्या प्रमाणात शिक्षण घेत आहेत.त्यामुळे या शाळा बंद करणे हे भावी पिढीला मारक आहे.तसेच देशाच्या शैक्षणिक,सामाजिक,सांस्कृतिक गुणवत्तेवर याचा विपरीत परिनाम होऊ शकतो.त्याचबरोबर भारतीय राज्यघटनेच्या मुलभुत शिक्षण हक्काच्या विरोधात आहे.म्हणून सर्व सरकारी शाळा वाचविण्यासाठी,जिल्हा परिषद शाळा CBSE इंग्रजी माध्ययमाःच्या करण्यात याव्यात,२० पेक्षा कमी पटसंख्याअसलेल्या शाळा बंद करण्यात येवू नये,शिक्षक भरती करुन शाळांना शिक्षक देण्यात यावेत व त्यांना अशैक्षणिक कामांपासुन दुर ठेवावे,सरकारी कर्मचारी व लोकप्रतिनिधी यांच्या पाल्यांस सरकारी शाळेत शिक्षणाची सक्ती करण्यात यावी,या मागण्या पुर्ण झाल्यास ग्रामीण व शहरी भागातील एकही सरकारी शाळा बंद होणार नाहीत त्यामुळे जनहितासाठी व देशहितासाठी या मागण्या मान्य करण्यात याव्यात.निवेदन सादर करते वेळी सरपंच संघटने जिल्हा अध्यक्ष हेमंत लांजेवार,सरपंच सौ.शर्मिला रामटेके,सरपंच गणेश गड्डमवार,सरपंच अमोल बावणकर,सरपंच, देवेंद्र गेडाम,रोशन वाघमारे,नंदकिशोर बूरकाळे,सतिश डांगे, निशा सिडाम,रविंद्र निकुरे,अनिता पेंदाम व गावातील विद्यार्थीचे पालक उपस्थित होते.