कृषी उत्पन्न बाजार समितीत कापूस व सोयाबीन खरेदीला सुरुवात

श्री.अरुण बारसागडे,चंद्रपूर जिल्हा प्रतिनिधी, न्यूज जागर 

 

पहिल्या दिवशी ४०० क्विंटल कापसाची खरेदी

भद्रावती – कृषी उत्पन्न बाजार समिती भद्रावती उपबाजार आवार मुर्सा येथे कापूस व सोयाबीन खरेदी ला सुरुवात करण्यात आली.
या कार्यक्रमाचे उद्घाटक म्हणून बाजार समितीचे प्रशासक मुकुंद मेश्राम यांनी केले यावेळी मुर्सा संचालक अशोक हरियाणी, भारती हरियाणी , सचिव नागेश पुनवटकर, संजय शेंडे, प्रवीण राहुलकडे, ‘ गणेश नागोसे . अरुण पाठक आदी उपस्थित होते विक्रीसाठी आलेल्या पाच शेतकऱ्यांचा प्रथम सत्कार करण्यात आला पहिल्या दिवशी शेतमालाची आवक ४ooक्विंटल कापूस व ३o१ क्विटल सोयाबीन खरेदी करण्यात आली. शेतकऱ्यांनी शेतमाल मुर्सा येथे विक्रीसाठी आणण्याचे आव्हान बाजार समितीचे सचिव नागेश पुनवटकर यांनी केले आहे.