श्री. अरुण बारसागडे,जिल्हा प्रतिनिधी, न्यूज जागर
अनेक संकटात अडकलेले शेतकरी आपल्या कुंटूबांची पालनपोषण करण्याकरिता इथून तिथून पैसा जमा करून धान, कापूस, सोयाबीन, तूळ पिकांची लागवड केली अतिवृष्टी आणि पूर आणि रोगा ने पहिलेच शेतकऱ्यांचे कंबरडे मोडले गेले आणि आता वन्य प्राण्यामुळे शेतकऱ्यांचे नुकसान होत आहे इकडे आड तिकडे विहीर या मनिप्रमाणे शेतकऱ्याची अवस्था झालेली दिसून येत आहे.सावली तालुक्या लगतच असलेल्या कवठी गावातील परिसरात मागील काही दिवसापासून जंगली प्राण्याचा हैदोस वाढलेला आहे. कवठी परिसरातील शेतकरी धान, कापूस, सोयाबीन, तूळ पिकांची लागवड केलेले आहे आणि आता ऐन हंगामाच्या वेळेस रानडुक्कर मोठया प्रमाणात शेतकऱ्याची नुकसान करीत आहे. त्यामुळे आमचं पिकाला लावलेलं खर्च निघनार की काय? परिसरातील शेतकरांच्या जमिनी गावाला लागूनच आहे नेहमी फटाक्यांची आतिष बाजी होत असते तरी पण नासाडी करत असतात त्यामुळे हातात आलेले पीक हातातून निसटून गेल्याचे दिसून येत आहे
या वन्यप्राण्यांच्या हैदोस मूळे शेतकऱ्यावर संकट निर्माण होऊन राहिले
शेतकऱ्यांचे पिकांची कोणत्याही प्रकारची वन्यप्राण्यापासून नुकसान होऊ नये या करिता संबंधित अधिकारी यांनी तुरंत दखल घेऊन लवकरात लवकर बंदोबस्त करावा अशी मागणी विलास बट्टे उपसरपंच आणि कास्तकारांनी करीत आहेत