श्री.अरुण बारसागडे,चंद्रपूर जिल्हा प्रतिनिधी, न्यूज जागर
जयस्वाल. परिवार चा उपक्रम
शेगाव बु
स्थानिक शेगाव बू येथील प्रतिष्ठित तथा कृष्णाकित पेट्रोल पंप चे मालक श्री कन्हैया जयस्वाल यांनी विद्यार्थी युवक युवती करिता दिवाळी ची विशेष भेट म्हणून गोर गरीब विद्यार्थ्यांना स्पर्धा परीक्षा चे पुस्तके वाटप करण्याचा निर्धार केला असून . ग्रामीण विद्यार्थ्यांची बुध्दीमत्ता वाढवावी व तसेच ग्रामीण भागातील विद्यार्थी देखील उच्च पदावर विराजमान व्हावे या करिता पुस्तक दान – सर्वश्रेष्ठ दान , हा मूलमंत्र लक्ष्यात घेऊन हा उपक्रम खास दिवाळी महोत्सव निमित्याने राबविण्यात येत आहे .. या अनेक उच्च पदावर झेप घेणारे पुस्तक उपलब्ध असून अनेक शासकीय अधिकारी पदावर पोहचविणारे पुस्तके उपलब्ध असल्याचे त्यांनी सांगितले . यात अनेक गोर गरीब विद्यार्थि पुस्तकं अभावी मागे राहतो. तेव्हा ग्रामीण भागातील सर्व विद्यार्थ्यांनी याचा लाभ घ्यावा. विशेष तर .दहावी पास , बारावी पास , उच्च शिक्षित विद्यार्थ्यांनी हवे असलेले स्पर्श परीक्षेचे पुस्तक अगदी मोफत घेऊन जाण्याचे आवाहन केले आहे… कृष्णाकीत पेट्रोल पंप शेगाव बू कार्यालय येथून हे पुस्तके घेऊन जावे…