महेंद्र कोवले यांची वंचितच्या जिल्हा उपाध्यक्ष पदी निवड 

श्री.अरुण बारसागडे,चंद्रपूर जिल्हा प्रतिनिधी, न्यूज जागर

सिंदेवाही :- ॲड. बाळासाहेब आंबेडकर यांचे नेतृत्वात राज्यात काम करत असलेली वंचित बहुजन आघाडी ने झंझावात निर्माण केला असून नुकत्याच पार पडलेल्या कार्यकर्ता बैठकीत महेंद्र कोवले यांची वंचित बहुजन आघाडीच्या जिल्हा उपाध्यक्ष पदी नियुक्ती झाली आहे.

सिंदेवाही येथील मैत्रेय बुद्ध विहारात नुकताच कार्यकर्ता मेळावा पार पडला. यामध्ये राज्याचे प्रदेशाध्यक्ष रेखाताई ठाकूर यांचे आदेशान्वये विदर्भ प्रमुख कुशलभाऊ मेश्राम यांचे पुढाकाराने जिल्हाध्यक्ष पुराणिक गोंगले यांनी नियुक्ती केलेली आहे. महेंद्र कोवले यांनी या पूर्वी तालुका संघटक म्हणून काम पाहत होते. त्यांच्या कार्याची दखल घेऊन वरिष्ठ पदाधिकारी यांनी कोवले यांची जिल्ह्याच्या उपाध्यक्षपदी निवड केली आहे. याबाबत सिंदेवाही तालुक्यातून सर्वत्र अभिनंदन करण्यात येत आहे.