श्री.अरुण बारसागडे,चंद्रपूर जिल्हा प्रतिनिधी ,न्यूज जागर
विद्यार्थ्यांचे व नागरिकांचे मोठे हाल
गडचांदूर
कोरोना महामारीने मागील दोन वर्षांपासून शाळा महाविद्यालये बंद असल्याने व मागील काही महिन्यांपासून गडचांदूर-भोयगाव रस्त्याचे काम सुरू असल्याने राजुरा निमणी गडचांदूर बससेवा बंद करण्यात आल्याने विद्यार्थी व नागरिकांचे मोठे हाल होत आहे निमणी ग्रामपंचायत माजी उपसरपंच उमेश राजूरकर यांनी बस सेवा पूर्ववत तात्काळ सुरू करण्याची मागणी राजुरा आगार व्यवस्थापक महेश राकडे यांना निवेदनातून केली आहे
गडचांदूर येथे महाविद्यालयीन शिक्षण घेणारे विद्यार्थी मोठ्या प्रमाणात आहे कोरोनामुळे मागील दोन वर्षांपासून बस सेवा बंद असल्याने निमणी हिरापूर धूनकी लखमापूर येथील सर्व विद्यार्थ्यांना व नागरिकांना शाळा महाविद्यालय सरकारी कार्यालय दवाखाना शेती साहित्यासाठी गडचांदूरला येजा करावे लागत असल्याने तीन किलोमीटर पायदळ तर ऑटोला जास्तीचे पैसे देऊन जावे लागत असल्याने कष्टकरी आईवडिलांना परवडण्यासारखे नसल्यानें मोठे हाल होत आहे त्यातच गडचांदूर भोयगाव या रस्त्याचे काम पूर्ण झाले असून जड वाहतुकीसाठी हा रस्ता सज्ज झाला आहे, दिवाळी सुट्यानंतर शाळा महाविद्यालये सुरू झाली आहे तेव्हा राजुरा निमणी गडचांदूर सकाळी ६:०० व १०:०० तसेच गडचांदूर निमणी राजुरा मार्गे दुपारी १२:०० व सायंकाळी ५:३० वाजता अश्या चार फेऱ्या पूर्ववत तात्काळ सुरू कराव्या अशी मागणी ग्रामस्थांकडून होत आहे यावेळी शैलेश लोखंडे प्रकाश टेंभुर्डे अनिल कारेकर शुद्धोधन जगताप संतोष गारघाटे बंडू बांदूरकर बालाजी टोंगे योगेश्वर घाटे स्वप्नील उईके आदी उपस्थित होते.
कोरोना महामारीमुळे व भोयगाव-गडचांदूर या रस्त्याचे काम सुरू असल्याने राजुरा निमणी गडचांदूर मार्गे बस सेवा बंद केल्या होत्या त्या पूर्ववत सुरू करू
महेश राकडे
राजुरा आगार प्रमुख
शाळा महाविद्यालये दिवाळी सुट्यानंतर सुरू झाले असून भोयगाव गडचांदूर रस्त्याचे काम पूर्ण झाल्याने विद्यार्थ्यांना व नागरिकांना नाहक त्रास सहन करावा लागत आहे तेव्हा तात्काळ बससेवा सुरू करावी
उमेश राजूरकर
माजी उपसरपंच ग्रामपंचायत निमणी